दामिनी पथकाची कारवाई, देहविक्रय करून घेणाऱ्या महिलेसह दोघांना अटक.*



            *दामिनी पथकाची कारवाई, देहविक्रय करून घेणाऱ्या महिलेसह दोघांना अटक.*





लातूर प्रतिनिधी 

                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 12/07/ 2021 रोजी शहरात पेट्रोलिंग करीतअसताना दामिनी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वीरहनुमंतवाडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एक महिला तिचे राहते घरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेत आहे.

                 सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व भक्ती गीत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वाखाली महिला तक्रार निवारण केंद्र, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक दिपाली गीत्ते, यांचेसह दामिनी पथकातील अधिकारी व महिला अमलदार यांचे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला. त्या ठिकाणी दोन पुरुष नामे

 1)ज्ञानेश्वर रामकिशन आंधळे, वय 35 वर्ष ,राहणार- हंगेवाडी तालुका अहमदपूर.

2) श्रीमंत मानाजी तांदळे, वय 30 वर्ष, राहणार-काळेवाडी,किनगाव तालुका अहमदपूर.

असे व दोन महिला आढळून आल्या. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 37,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच नमूद महिला कडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारी महिलाही मिळून आली.तीस तिचे नाव विचारले असता त्याने तिचे नाव- कविता अविनाश शिंदे,वय 28 वर्ष,राहणार वीर हनुमंतवाडी लातूर असे असल्याचे सांगून स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते असे सांगितले. 

               त्यावरून पोलीस पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर 372/2021.कलम. 370,34 ,भा.द. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959, कलम-3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात 

1) कविता अविनाश शिंदे

 2)ज्ञानेश्वर रामकिशन आंधळे

3) श्रीमंत मानाजी तांदळे यांना अटक करण्यात आली आहे.

                   सदरच्या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीत्ते, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले, महिला पोलीस अमलदार आशा साखरे,सोनाली ढगे, चालक पोलीस अमलदार अरविंद जोगदंड यांचा सहभाग होता.

                    गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय हिबारे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या