औसा तालुक्यात प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापना करणार —शिवरुद्र बेरुळे
औसा प्रतिनिधी विलास तपासे /मुख़्तार मणियार आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबद्दल शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरुळे म्हणाले की वंचित बहुजन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये कार्यकर्ते वाढवावे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये पंचायत समिती गणामध्ये कार्यकर्त्यांची निवड करण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तालूका अध्यक्षांची भेट घ्यावी अशी विनंती करण्यात आली
वंचित बहूजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची दोन दिवसांपूर्वी बायपास सर्जरी झाल्याचे वृत्त पक्षाच्या फेसबुक पेजवरुन तसेच प्रसार माध्यमातून समजताच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी औसा तालुका वंचित बहूजन पक्षाच्या वतीने परमेश्वराला याचना करण्यात आली
औसा तालुका वंचीत बहुजन आघाडी तालुका औसाच्या वतिने तालुका आध्यक्ष श्री शिवरुद्र बेरुळे यांच्या आध्यक्षतेखाली दुपारी ठिक १२:०० वाजता संपुर्ण औसा तालुका कार्यकारीनीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत आगामी येणार्या नगरपालीका,पंचायतसमिती व जिल्हपरिषद निवडनुका लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. व वंचीत बहजन आघाडीची गाव तेथे शाखा व वार्ड तेथे बोर्ड स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला.
तसेच पक्षाची औसा शहर कार्यकारीनी व तालुका ग्रामिण कार्यकारीनी तयार करण्या संदर्भात शिवरुद्र बेरुळे(आप्पा) यानी मार्गदर्शन केले.
सदरील बैठकीस श्री अँड. जयराज जाधव व सतिष गायकवाड, शाम पावले( तिन्ही जिल्हाऊपाध्यक्ष),
सुभाष भालेराव व श्रावण कांबळे ( दोन्ही तालुका महासचिव.),
ईंद्रसेन जाधव,सुर्यकांत जाधव, नागसेन गायकवाड(तिन्ही तालुका ऊपाध्यक्ष)तसेच .श्री गजानन गिरी (कायदेशिर सल्लागार ),श्री विलास तपाशे (प्रसिधीप्रमुख औसातलुका)व शंकर बोडके,कल्याण पाटील,मुरली शिंदे,दयानंद गायकवाड, मलिक कांबळे, बाबा रोंगे,अमर लांडगे,सचिन लांडगे,विशाल वाघमारे
वरिल बैठकीस हजर होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.