प्राकृतिक विद्यापीठ , आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फळबाग रोपांचे वाटप

 


प्राकृतिक विद्यापीठ , आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फळबाग रोपांचे वाटप









लातूर जिल्ह्यात  राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. याचा परिणाम येथील पाणी, शेती व जनजीवनावर होत आहे. वातावरणातील बदलामुळे पावसाची अनियमितता व न परवडणारी शेती यामुळे लातूर जिल्ह्यात अनेक शेतकरी मागच्या काही वर्षात आपले गावाकडून शहराकडे स्थलांतर करीत आहेत. या वातावरणातील बदल यावर मात करण्यासाठी
आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून मागील १० वर्षापासून लातूर जिल्ह्यात जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. संपूर्ण पाणलोट विकास कार्यक्रम च्या माध्यमातून माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामासोबत  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फळ झाडांचे वाटप करण्यात येत आहे. मागील पाच वर्षात आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात सोशल फॉरेस्ट्री आणि फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून दोन लाखापेक्षा अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर नदीकाठी व सार्वजनिक आणि वनखात्याच्या जमिनीवर  एक लाख वृक्ष लागवड करण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात मा.  श्री पृथ्वीराज बीपीजिल्हाधिकारी लातूर, यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना अत्यंत माफक व सवलतीच्या दरात यावर्षी देण्यात येत आहेत. सोबतच लागवडीपासून काढणीपर्यंत चे मार्गदर्शन प्राकृतिक विद्यापीठ बाबळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्राकृतिक विद्यापीठ बाभळगाव येथे संपर्क साधावा असे प्रकल्प संचालक श्री महादेव गोमारे यांनी सांगितले आहे.
चार-पाच वर्षापूर्वी दिल्या दिलेल्या फळबागांना यावर्षी फळे लागण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मुख्य पिकासोबत एक शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा दुसरा मार्ग मिळाला आहे.  आर्ट ऑफ लिविंग च्या ऍग्रो फॉरेस्ट्री प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेती आणि फळबाग एकत्रित करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सातत्याने देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी ऍग्रो फॉरेस्ट्री प्रकल्पाकडे  वळले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना वातावरणातील बदलाची सुसंगत शेती करता येईल व दुष्काळी व अडचणीच्या परिस्थितीत शाश्वत उत्पन्न घेता येईल असे आर्ट ऑफ लिविंग नदी पुनर्जीवन प्रकल्प संचालक श्री महादेव गोमारे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या