व्यसन नष्ट करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक ; अतनूर येथे गुटख्याची होळ्ळी, व्यसनमुक्तीची शपथ!*
*व्यसन नष्ट करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक ; अतनूर येथे गुटख्याची होळ्ळी, व्यसनमुक्तीची शपथ!*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी, अल्ताफ शेख
समाजात आजकाल किशोरवयीन मुले ड्रग्जकडे अधिक आकर्षित होतांनी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेखही सतत वाढताना दिसून येतो. मुले पटकन उग्र होतात, आकर्षित होतात, हट्टीपणा करतात, सर्व काही द्रुतपणे मिळवण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक मुले, महान समाज सुधारकांना किंवा क्रांतिकारक शहीद ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे किंवा कठोर मेहनत घेऊन देशासाठी गौरव घडवून आणणाऱ्या महान बौद्धिक व्यक्तिमत्त्वांना आदर्श म्हणून नव्हे तर चित्रपट, फॅशनमधील कलाकारांना आणि दबंगई करणाऱ्या लोकांना त्यांचे रोल मॉडेल मानतात आणि त्यांना जसे दिसते, तसेच व्हायचे असते, यासाठी मग त्यांना शॉर्टकट मार्ग जरी घ्यावा लागला तरी बरं. सिगारेट तंबाखू हुक्का आणि अल्कोहोलपासून नशा सुरू होवून समोर गांजा, ड्रग्स, हेरोइन, अफू, चरस, दारू च्या दिशेने पुढे जातात. नंतर आम्ल पदार्थाची तल्लफ अशा प्रकारे वाढतच जाते. महागडे छंद, फॅशन, देखावा, शॉर्टकटमध्ये पैसे कमवायची इच्छा, स्वत:चा दबदबा दाखवण्यासाठी आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी ही किशोरवयीन मुले गंभीर गुन्हे करतात. अनेकदा लोक लहान मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात, परंतु काहीवेळा ही चूक पुढे जाऊन मोठ्या अपघाताचे रूप धारण करते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिक असणे गरजेचे आहे. जेणेकरून व्यसनी रुग्णांसाठी उपचाराची सोय उपलब्ध होईल. शासकीय, निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटना या सर्वांनी व्यसन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.असे मत लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर सेवाभावी संस्था अतनूर, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जयहिंद क्रिडा मंडळ व व्यायाम शाळा अतनूर, वसुंधरा महिला मंडळ व जिजामाता महिला मंडळ अतनूर, यांच्या संयुक्तपणे व विधेमाने आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन व व्यसनमुक्तीचा संकल्प (दि.२६) जून जागतिक अंमली पदार्थ दिन गाव-तांडा- वस्ती- वाडीतील व्यसनमुक्त चळवळ जाणीवजागृती व जनजागृती पासून ४१ दिवशीय समारोप (दि.७) जुलै बुधवार रोजी अतनूर येथील कुलस्वामिनी भवानीमाता मंदिरासमोर उपरोक्त सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व्यसनमुक्तीची होळी व व्यसनाधिन राहण्यासाठी शपथ समारोप कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक दारूबंदी मुक्त चळवळीचे सामाजिक समाजसेवक कार्यकर्ता बी.जी.शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात कुलस्वामिनी भवानीमाता यांच्या मंदिराच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. २६ जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवसापासून ते ४१ दिवशीय गाव-तांडा- वस्ती- वाडीतील व्यसनमुक्त चळवळ जाणीवजागृती, जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप औचित्याने उपरोक्त सेवाभावी संस्था, व्यसनमुक्तीवर कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटना, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणून अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ.हरेश्वर सुळे यांनी व्यसनी रुग्णावरील उपचार पद्धती, मानसिक आजाराबद्दल मार्गदर्शन केले. बालासाहेब शिंदे यांनी उपस्थितांना अंमली पदार्थापासुन स्वतः परावृत्त राहुन इतरांना परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थाच्या विरोधातील शपथ दिली. तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवरील समाजसेवक, सेवाभावी संस्था, व्यसनमुक्त चळवळीतील कार्यकर्ते, वेबीनार मधे अनेक जण Say No to Drugs चे. मास घालून सर्वांना संदेश देत होते. पुढे बोलतांना बालासाहेब शिंदे म्हणाले, पोलिस स्टेशन, आरोग्य विभाग, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी शासकीय कार्यालयात महिन्यातून दोनदा सभेचे आयोजन करून व्यसनमुक्तीसाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. विविध विभागातील कर्मचारी व लाभार्थी व्यसनी आढळून आल्यास त्यांना व्यसनमुक्तीची शपथ व अति व्यसनाधीन व्यक्तिला उपचारासाठी मोफत व्यसनमुक्त सल्ला केंद्रात व क्लिनिकमध्ये पाठविले पाहिजे. व्यसनी रुग्णांना स्वतःच्या इच्छेने उपचार घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहनही बालासाहेब शिंदे यांनी केले. तर २८ गाव-तांडा- वस्ती- वाडीतील ३५ हजारांच्या वरती असलेल्या अतनूर आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ.हरेश्वर सुळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यांची माहिती दिली. अंमली पदार्थ आणि राष्ट्रीय हानी याचा संबंध जोडून अंमली पदार्थांचा देशद्रोहासाठी होणारा आणि त्यासाठी युवकांचा होणारा वापर, पैशांच्या मोहामुळे त्यात अडकत जाणारी युवापिढी हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगत आपण सर्वांनी याबाबत सतर्क राहून अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ नार्कोटिक्स कंट्रोल विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले. यावेळी कुलस्वामिनी भवानीमाता मंदिरासमोर अतनूर येथे तरुणांनी गुटख्याच्या पाकिटाची होळी करून घेत व्यसन मुक्तीची शपथ घेतली.या शपथ सोहळ्याच्या वेळी कुणबी मराठा मंडळाचे संस्थापक प्रदेशअध्यक्ष बी.जी. शिंदे, युवासेना-शिवसेना जळकोट तालुका सरचिटणीस मुक्तेश्वर येवरे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, आरोग्यमित्र बालासाहेब शिंदे, सुरेश बोडेवार, भारतीय जनता पार्टीचे जळकोट तालुका उपप्रमुख चंद्रशेखर गव्हाणे-पाटील, तानाजी सोमुसे, गोविंद बारसुळे, खंडू गायकवाड, श्रीकांत बोडेवार, तेजस गायकवाड, सुधाम बाबर, माधव रेड्डी, अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.