*राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ! - हवामान विभागाचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद,
मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे - त्यानुसार कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
मात्र राज्याच्या इतर भागात तुरळक पावासाची शक्यता आहे - असा इशारा भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे
*कुठे आहे पावसाचा अलर्ट ?*
● *रेड अलर्ट* - आज 19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला असून - या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो
● *ऑरेंज अलर्ट* - आज 19 जुलै रोजी पुणे, ठाणे आणि पालघरला तर - 20 , 21 आणि 22 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून - या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
● *यलो अलर्ट* - आज 19 जुलै रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगलीला - तर 20 जुलै साठी अमरावती आणि नागपूर तसेच 21 जुलै साठी चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून - या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे
*हवामान विभागाने दिलेली* - हि माहिती,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.