कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना एनएसएफडीसीचे चार लाखांपर्यंत कर्ज*

 *कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना एनएसएफडीसीचे चार लाखांपर्यंत कर्ज*




दि. - 7 उस्मानाबाद -  

नवी दिल्ली  येथील राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.) यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.यात कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Brendearner) मृत्यू पावली आहे.अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास पाच लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. 

         यात कर्ज चार  लाख  रुपयांचे कर्ज सहा टक्के व्याज दराने दिले जाईल. भांडवली अनुदान एक लाख रुपये दिले जाईल.मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता,आधार क्रमांक, जन्मतारीख,लिंग, जात/पोटजात,मृत्यूची दिनांक,रेशनकार्ड,मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला.कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या,कुटुंबातील प्रमुख वारसदार,कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न  तीन लाखाच्या आत असले पाहिजे.

       कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने ही माहिती सोबत लिंक-https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7 वर किंवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठवावी,असे जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.यांनी कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या