लातुरात आज ओबीसी-व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळावा
सर्वपक्षीय ओबीसी प्रतिनिधींची उपस्थिती
नाना पटोले,पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार,धनंजय मुंडे करणार ऑनलाइन मार्गदर्शन
लातूर/प्रतिनिधी:सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित केल्यानंतर ते पुनर्स्थापित करावे या मागणीसाठी शनिवार दि.२४ जुलै रोजी लातूर येथे व्हीजेएनटी-ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आरक्षण जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व मंत्री विजय वडेट्टीवार,माजीमंत्री पंकजा मुंडे हे या मेळाव्यास ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मेळावा संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे आरक्षण स्थगित केल्याचा फटका राज्यभरातील ५६ हजार लोकप्रतिनिधींना बसणार आहे.हे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.राज्यातील ३४ जिल्हा परिषदा,नगरपंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू झाला आहे. ओबीसींचे हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.मेळाव्यात या प्रश्नाबाबत चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या मेळाव्यास जि.प.चे अध्यक्ष राहुल केंद्रे,आ.रमेशअप्पा कराड,माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे,आ. राजेश राठोड,माजी आमदार गोविंद केंद्रे,बब्रुवान खंदाडे,रामराव वडकुते,व्हीजेएनटी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप,अनिल खरमाटे,ईश्वर बाळबुधे, बालाजी शिंदे,नारायण मुंडे, जि.प.चे सभापती गोविंद चिलकुरे,औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख,निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,अहमदपूरच्या उपनगराध्यक्षा मीनाक्षी रेड्डी, रेणापूर नगरपंचायतचे उपाध्यक्ष अभिषेक आकनगिरे,ओबीसी नेते बबनराव तायवाडे,काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,भाजपा ओबीसी विभागाचे अध्यक्ष बापुराव राठोड,लातूरचे माजी उपमहापौर देविदास काळे, मनपातील गटनेते शैलेश गोजमगुंडे,विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सूळ,स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे ,निलंग्याचे गोविंद शिंगाडे,अहमदपूरचे भारत चामे,उदगीरचे भारत चामले ,बालाजी रेड्डी,सुधीर अनवले,भटके विमुक्त नेते हरिभाऊ गायकवाड,
गंगापुरचे सरपंच बाबू खंदाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,सरपंच, नगरसेवक तसेच ओबीसी जातीमधील सर्व संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.मेळाव्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे.शनिवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ९:३०वाजता शाम (दिवाणजी) मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी लातूर येथे जागर मेळावा होत आहे.सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ओबीसींच्या हक्कांना वाचा फोडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी -
व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य पातळीवरील नेते साधणार संवाद ...
ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार,धनंजय मुंडे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.हे मान्यवर नेते ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीला त्यांचे पाठबळ मिळणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.