मा.खा. डॉ. सुनील ब गायकवाड यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स कडून: छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ जाहीर.
मुंबई ( विशेष प्रतिनिधी)
लातूर लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असलेला "दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स मुंबई कडून दिला जाणारा यावर्षीचा "छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नुकताच संसद रत्न मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना याच आठवड्यात मुंबई येथे "इंडियन स्टार्स अवॉर्ड"हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
मुंबई च्या रंगशारदा सभागृहात भव्य कार्यक्रमात दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देऊन डॉ सुनील गायकवाड यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स कडून संस्थापक अध्यक्ष कल्याणजी जाना यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
संसद रत्न मा खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कामाची आणि लोकसभेत अनेक कायदे तयार करताना त्यावर केलेल्या भाषणाची दखल घेऊन,आपल्या भारताचे खासदार असताना दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व परदेशात करून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा "वर्ल्ड ई पार्लमेंट - साऊथ अमेरिका चिली" आणि " एशियन कंट्री सोशल जस्टिस कॉन्फरन्स भूतान" या दोन्हीही ठिकाणी भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे चेअरमन म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. संसदेने सोळाव्या लोकसभा खादारांचा परफॉर्मन्स ४६८ खासदार यांची उपस्थिती आणि संसदेत विचारलेले प्रश्न,आणि अनेक विधयका वर केलेले भाषणे यांचा आधारे डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा १३ वा रँक आला होता आणि उपस्थिती ९५.७७% होती.
सर्व कामगिरी बद्दल हा छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ देऊन त्यांचा गौरव होणार आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक करून शुभेच्छा चा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.