माननीय आमदार अभिमन्यूभाऊ पवार वाढदिवस विशेष
शेतकरी मित्र
जीवनात वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. किंबहुना व्यक्ती आणि कार्य यामुळे वाढदिवस महत्त्वाचा आणि विशेष ठरतो. याठिकाणी औसा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूभाऊ पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने मागील सुमारे दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघा अंतर्गत विविध विकास कामांचा धडाका लावलेला आहे. शेती आणि ग्रामीण विकास हा त्यांच्या विकासाचा विशेष मॉडेल ठरेल. कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. वर्तमान covid-19 च्या आपत्ती काळात हे शेती क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरले. कारण वर म्हटल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच प्रमुख्याने अवलंबून आहे. शेती आणि शेतकरी यांच्या विकासाला अधिक प्राधान्य मिळाले तर शेतीमधील उत्पादनात दुपटीने वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांच्या कष्ट आणि परिश्रमामूळे देशाची प्रगती होते. त्यामुळे दिसून आलेले आहे. शेती आणि शेतकरी हाच आमदार पवार यांचा विषय राहिलेला आहे. या काळात त्यांनी क्षेत्रांत मूलभूत विकासासोबतच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिलेले दिसते. सदर कामे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अमित विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दमदारपणे धुमधडाक्यात होत आहेत. या जिल्हा अंतर्गत काही मतदारसंघात जेथे गाव तेथे रस्त्यास प्राधान्य दिलेले दिसते. सदर गाव रस्ते गत पन्नास वर्षात केवळ नकाशा वर राहिलेले आपण ऐकतो. रस्ते पुन्हा नव्याने विकसित झाले तर गावा गावांचा संपर्क वाढेल. शेती आणि शेतकरी आपल्या व्यवसायानिमित्त रस्त्यांचा अधिक वापर करतील. वेळ आणि पैशाची बचत होईल. औसा विधानसभा मतदारसंघांतर्गत शेतकरी हिताच्या दृष्टीने फळबाग लागवड, जनावरांसाठी गोठे इत्यादी कामे करण्यात येत आहेत. या बाबी शेती विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरतात. विधानसभा मतदारसंघात प्रथम भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले. वास्तविक पाहता लोकशाहीचा विजय होय.भारतीय जनता पार्टी म्हटले की काहीजणांना जातिवाद वाटतो. भारतीय लोकशाही राज्यघटना अशा बाबींचा निषेधच करते. काहीजण आपल्या स्वार्थासाठी भाजपा पक्ष म्हणजे जातीवादी असे म्हणून टाळ्या घेतात. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये लोकहित सार्वमत लोक हेच सार्वभौम होत. लोकशाहीत अंतिम सत्ता लोकांचीच असते आणि ती लोकांनी स्थापन केलेली असते. आमदार असो खासदार असो त्यांना जातीवादी असे संबोधन. त्या मतदारांचा अवमान ठरेल याचे भान असायला हवे. वास्तविक पाहता याठिकाणी हा मुद्दा उपस्थित करणे अप्रस्तुत ठरेल. मात्र अशी चर्चा केल्यानंतर त्यांना उत्तर देणे योग्य ठरेल. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. या स्तंभाने प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पाडायला हवी. मात्र असे होताना दिसत नाही याचा खेद होतो. सर्व माध्यमे अशी असतील असे नव्हे मात्र सभोवार पाहता दृष्टीला पडते. लोकशाही आणि लोकमतांच्या दृष्टीने त्यांचा अवमान होणार नाही हे पाहणे आपली जबाबदारी होय. राज्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला भवितव्य आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून सर्वांना सोबत घेऊन वाटचाल होत आहे आशा अपेक्षा या पक्षाकडून वाढत आहेत या सोबत वाटचाल होत आहे. जनतेप्रति जनहितासाठी प्रतिबद्ध राहून त्यासाठी संघर्ष करणे हा भारतीय जनता पार्टीचा स्थायीभाव राहिलेला आहे. सत्ता आज आहे उद्या नाही. परंतु जनतेप्रती उत्तरदायित्व हे भारतीय जनता पार्टी कडून शिकायला हवे.मा.अभिमन्यूभाऊ पवार हे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचे माजी स्वीय सहाय्यक या माध्यमातून प्रशासकीय कामांचा अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे आणि आज राज्यात भाजपचे सरकार नाही हे मान्य आहे मात्र भाजप हाच जनतेने स्वीकारलेला पर्याय आहे. हे आपण भाजपच्या नंबर 1 संख्या वरून पाहत आहोत. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला आवळ्या भोपळ्याची मोट बांधणे कठीण नव्हेेे. मात्र भावी काळात भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन करणे केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला महत्त्वाचे आणि आवश्यक वाटतेे. यानिमित्ताने अशा बाबींचा उहापोह करणे अनावश्यक ठरते. मात्र व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त व्यक्ती आणि कार्य आणि त्या संदर्भात यांचे संदर्भ या बाबींची अवलोकन करणे ही आवश्यक वाटते. वर म्हटल्याप्रमाणे आपला नेता कोण असावा हे लोकशाहीत मतदार ठरवीत असतात. त्यामुळे एखाद्या नेतृत्वावर जातीपातीचा आरोप करणे याचे विश्लेषण आम्ही करणार नाही राजकारणात सोयीसाठी ही चालतच असते. आगामी काळात आमदार अभिमन्यूूभाऊ पवार मतदारसंघात विकासाला प्राधान्य देतील. विरोधी पक्षनेते मा. फडणवीस साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी त्यांना लाभत असतेे. विरोधीपक्ष म्हटले की लोक हक्कासाठी लढा हा आलाच आणि तो करणे भाजपचा स्थायीभाव आहे. लोकशाही लोकविकास कल्याण यासाठी भाजप कार्यरत आहे. या पक्षाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूभाऊ पवार यांना वाढदिवसानिमित्त आमच्या आभाळभर शुभेच्छा आभाळभर शुभेच्छाा! तुर्तास एवढे पुरे!
विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार औसा 9552197268
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.