*रेशन दुकानदारांना कमिशन विचारीत करा- रास्त भाव दुकानदार संघटनेची मागणी*
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
दि. 10 - उस्मानाबाद
मे 2021 चे चलन भरणा केलेल्या व राज्य शासनाने घोषित केलेल्या मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरित वितरित करावे आणि विविध मागण्यांसाठी रास्त भाव दुकानदार संघटनेच्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी च्या संकटकाळात रास्त भाव दुकानदार यांनी जीवाची परवा न करता राज्य शासन व केंद्र शासनाने पुरवठा केलेल्या अन्य धान्य वाटपाची जबाबदारी विनाशर्त बजावली आहे. या कोरूना काळात रास्त भाव दुकानदार हे कोरोनाग्रस्त झाले, तर काहींचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या व दवाखान्यात खर्च करून बरे होऊन घरी परतलेल्या रास्त भाव दुकानदार यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, रास्त भाव दुकानदाराने धान्य वितरित केलेल्या धान्याचे कमिशन संबंधित दुकानदारांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे, निवेदनावर जिल्हाध्यक्ष समाधान कदम, सचिव राजकुमार पवार, गौरी शंकर साठे, कोषाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे यांच्या सह्या आहेत.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.