पालकमंत्री अमित देशमुख नवीन रेणापुर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्यावर लक्ष घालतील का ...?

 पालकमंत्री अमित देशमुख नवीन  रेणापुर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्यावर लक्ष घालतील का ...? 

----------------------------------------------------










लातुर जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकी मध्ये ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मात्र या रस्याच्या कामाचे नियोजन व्यवस्थित नसल्याने या भागातील नागरिक आंदोलनात्मक धोरण ठरवणार असुन समीतीच्या माध्यमातुन आंदोलन उभे करणार आहें तसे पाहता  राजीव गांधी चौक ते नवीन नांदेड चौक , नवीन रेणापूर  नाका ते राजीव गांधी चौक हे लातूर शहराच्या लगतचे  रिंगरोड सर्व बाजुने राष्ट्रीय मार्गाने जोडले गेले  पण  नवीन  रेणापूर नाका ते नवीन  नांदेड नाका आहे या  रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आहे प्रवासी यांना  जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे  या  मार्गीवर डिमार्ट , टँन्टींवन शुगर फँक्टरी,  नांदेड मार्गाने जाणारी वाहने , लातुरातुन ६० फुट मार्गाने येणारे वाहणे ,   यांना हि याच मार्गाने  येणेजाणे करावे लागत आहे तसेच याच रस्त्यावरुन  सिध्देश्वर मंदिर येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी   हि मृतदेह हि याच मार्गीने घेऊन  जातात वाळुचे हायवे असो कि टँन्टींवन शुगर फँक्टरीचे जड वाहणे हि याच रस्त्याने जाताहेत  शेवटी हाच एकमेव मार्ग असल्याने वर्दळ वाढलेली आहे चौफेर विकासात  डिमार्ट हि याच मार्गवर आहे डिमार्ट च्या बाजूला जुनाकालीन पुल आहे  पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने  वाहतूक व्यवस्थाठप्प होते वाहतूक  सुरळीत होण्यासाठी किमान दोन दोन तास ताढकळत थांबावे लागते दिवसा खड्डे तर रात्रीच्या वेळी  अंधार अशा अवस्थेत  पुलावरुन  वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा सामना करावा लागतो  त्यात पाईप लाईन चे काम चालू असल्याने ठेकेदाराने तर कळसच गाढला अख्खे मातीच्या ढिगच्या ढिग रोडवर टाकलेल्या अवस्थेत आहेत   रस्त्यावर  चिखलच चिखल आहे  पाणी साचलेले असल्याने  अपघात चे प्रमाण वाढलेले आहे   महिला भगीनी या दुचाकीवरून जात असतांना वाहन स्लिप होताहेत   जिव धोक्यात घालून प्रवास  करावा लागत आहे तसेच  या भागतील नागरिक त्रस्त झालेले असुन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे लक्ष  घालतील का ? अशी या भागातील नागरिक चर्चा होत आहे

* नवीन रेणापूर नाका ते नवीन नादेंड नाका या खराब रस्त्यासाठी आंदोलनात्मक भुमिका घेण्यासाठी लवकरच  समीती गठीत  करण्यात येणार 

*  नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्याची अवस्था  कधी तळ्यात तळ कधी  मळ्यात 

* सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 

 लातूर महानगरपालिका यांच्या कडे वर्ग केले व आता मात्र राष्ट्रीय मार्गीशी जोडले जाणार असल्याने पुन्हा हा रस्ता कधी सुरळीत होणार ..।

* माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील यांनी हा रस्ता राष्ट्रीय मार्गीशी जोडणे आवश्यक असतांना का  जोडला नाही हा चर्चेचा विषय ठरत आहे 

* राज्यमंत्री संजय बनसोडे यांना हि  उदगीर मतदारसंघात जाण्यासाठी हाच रस्ता पण त्यांना हि घेणे देणे नाही  लोकप्रतिनिधी म्हणून तर विचार करावा..? 

* या रस्त्यावर प्रवासी प्रवास करतांना जिव धोक्यात घालून प्रवास करताहेत तेव्हा लोकप्रतिनिधी यांच्या विषयी संतप्त प्रतिक्रिया बोलुन दाखवताहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या