जुळे सोलापूर विजापूर रोड भागाचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश
सोलापूर (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला असून केंद्र सरकारकडून सोलापूर शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी सुमारे २९२१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, २०२५ पर्यंत संपूर्ण सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पण एरिया निवडताना काही भागास वगळले तर अचानकपणे सहा एरियांचा नव्याने समावेश करण्यात आला. सैफुल, जुळे सोलापूर, होटगी रोडवरील काही भाग वगळल्याने या भागाचा विकास होणार नाही त्यामुळे या भागातील नियमितपणे कर भरणार्या नागरिकांवर अन्याय होत असून वरील भागाचा स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील यांच्याकडे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या वतीने करण्यात आली. यामुळे छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय सोलापूर विमानतळ आसरा रेल्वे पूल रुंदीकरण जानकी नगर येथील बाग हद्दवाढ भागतील रस्ते, नियोजित विजापूर रोड एसटी स्टँड अर्धवट राहिलेले ड्रेनेजची कामे मार्गी लागतील असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच संभाजी ब्रिगेड व सोलापूरचे नागरिक चंद्रकांत गुद्देवार तुकाराम मुंडे अश्या प्रामाणिक काम करणार्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे स्मार्ट सिटी च्या योजनेतून सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलणारे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील यांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा सचिव राहुल सावंत शहर सचिव शंकर पडसलगी शहर संघटक हर्षवर्धन शेजेराव शहर उपाध्यक्ष सोमनाथ पात्रे शहर उपप्रमुख सिताराम बाबर शहर संघटक बसवराज आळंगे महेश माने शहरसहसचिव वैष्णव कोलते जिल्हा कार्याध्यक्ष अमिता जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत सुरवसे ईत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.