प्रहार कडून मदतीचा हात; निराधार सरुबाई टिके यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आधार

 प्रहार कडून मदतीचा हात; निराधार सरुबाई टिके यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आधार



प्रहार कडून मदतीचा हात; सरुबाई टिके यांच्या घराचा शुभारंभ....













औसा प्रतिनिधी विलास तपासे 

औसा तालुका येथील गुळखेडा गावांमध्ये राहत असलेल्या सरुबाई टीके यांच्या घराची दुरावस्था झाली होती याची बातमी राज्याचे शालेय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांना याची माहिती मिळताच त्यांनी लातूर जिल्हा प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने यांना आदेश देऊन सरुबाई टिके यांना पक्के घर बांधून देण्याच्या त्यांनी सूचना केल्या या सूचनेचा नुसारच लातूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने यांनी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाचे पालन करून औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरुबाई टीके यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये आज त्यांनी घर बांधण्यासाठी पायाभरणीचा शुभारंभ केला.

सरुबाई ठीके गेल्या अनेक वर्षापासून गुळखेडा गावामध्ये राहात आहेत त्या निराधार आहेत त्यांना सध्या कोणाचाही आधार नाही वीस वर्षांपूर्वी त्यांचे पती यांचे निधन झालं आहे त्यानंतर मुलाचं अपघातामध्ये निधन झालं त्यामुळे सर्व बाई आत्या एकट्या पडल्या कोणाचाही त्यांना आधार नाही ना कोणाचा सहारा नाही अशा सर्वांना आता प्रहार कडून पक्के घर बांधून दिले जात आहे केल्या आठवड्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यात अतिवृष्टी मध्ये औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरूबाईंचं घर सुद्धा या अतिवृष्टी मध्ये ढासळून ते घर पत्या सारखं कोलमडून गेल, त्यामुळे या निराधार असलेल्या सरुबाईना आता काय करावं हे समजत नव्हतं. मुंबईला वास्तव्य असलेल्या नातवाने त्यांच्या घराची पोस्ट राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना टाकली. आणि मदतीचा हात मागितला बच्चू कडू यांनी क्षणाचाही विचार न करता लातूर जिल्हा प्रहार पक्ष प्रमुख राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने या दोघांनाही आदेश देऊन तात्काळ या घटनेची दखल घ्यावी. अशा सूचना केल्या आणि त्यानुसारच लातूर जिल्हा प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले आणि कालिदास माने यांनी तात्काळ सरूबाईच्या मदतीला गेले. आणि त्यांना पक्के घर बांधून देण्याचा त्यांनी निर्धार घेतला बेसहारा असलेल्या सरुबाई यांना  आता प्रहारचा सहारा मिळतोय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या