महाड दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची केली विचारपूस

 

महाड दुर्घटनेतील जखमींवर जेजेरुग्णालयात उपचार सुरू

वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची केली विचारपूस

 

● जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार

● संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही













मुंबईदि२६ – अतिवृष्टीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ जखमींवर जेजेरुग्णालयात उपचार सुरू असून आजवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जेजेरुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केलीजखमींच्या उपचाराचा सर्व उपचार राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जेजेरुग्णालयाला भेट दिलीमहाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर येथे उपचार सुरू असून सर्व जखमींची यावेळी त्यांनी विचारपूस केलीसर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ज्या जखमींवर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहेत्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेकाही जखमींवर अतिदक्षता रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरडग्रस्तांना सर्व आवश्यक ती मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही श्रीअमित देशमुख यांनी सांगून या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहेत्याशिवाय पूरग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेतडेंग्यूसह इतर रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे.  या संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

००००००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या