साठे चौक ते शाहू चौक
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
असंघटित कामगार कॉंगे्रसची महापालिकेकडे मागणी
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
असंघटित कामगार कॉंगे्रसची महापालिकेकडे मागणी
लातूर / प्रतिनिधी- अत्यंत दुरवस्था झालेला शहरातील अणाभाऊ साठे चौक ते शाहू चौकापर्यंतचा रस्ता १ ऑगस्टपर्यंत दुरूस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असंघटित कामगार कॉंगे्रसच्यावतीने महानगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरातील रस्ते खड्डेमुक्त आहेत. परंतु, मागील अनेक वर्षांपासून शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते शाहू चौकापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीकडे महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यापूर्वी अनेकवेळा विविध संघटनांनी करून देखील महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पूर्व भागात राहणार्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर रस्ता १ ऑगस्ट रोजी होणार्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीपूर्वी दुरुस्त करण्याची मागणी असंघटित कामगार कॉंगे्रसच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष नागेश वाघमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बीएसएनएलचे सदस्य संजय सोनकांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, लातूर मजूर सहकारी संघाचे माजी संचालक बालाजी कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.