प्रहार अपंग संघटनेच्या वतीने खाडगाव परिसरात वृक्षारोपण
लातूर
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्यावतीने सोमवारी लातूर शहरापासून जवळ असलेल्या खाडगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी केशर आंब्याच्या २५ वृक्षाची लागवड संघटनेच्या पदाधिकार्यांनी केली.
प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हा समन्वयक प्रा. विनोद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस उद्धव जाधव, जिल्हा विधी सल्लागार अँड दुष्यंत पांचाळ, श्रीराम पाटील, विक्रम जाधव, अजित देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.