मुद्रा कर्ज योजनेतून बेरोजगार तरुणांना कर्ज वाटपासाठी विविध बॅंक शाखेना आदेशित करावे
शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील व परीसरातील बेरोजगार युवकांना नवीन व्यवसाय चालु करन्या साठी केंद्र सरकार चा *मुद्रा कर्ज* योजने खाली कर्ज वाटप साठी औसा शहरातील विवीध बैंक शाखांना आदेशित करावे या मागणीचे निवेदन दि.5 जुलै सोमवार रोजी मा. जिल्हाधिकारी साहेबांना *विलासराव देशमुख युवा मंच औसा* च्या वतीने देन्यात आले .याचे सविस्तर वृत्त केंद्र सरकारच्या छोटे व्यवसाय करणा-या व नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मुद्रा योजने खाली शिशू - किशोर व तरुण या तीन प्रकारचे कर्ज देण्याचे आदेश असताना औसा शहरातील व परिसरातील बॅंक शाखेकडून या योजनेखाली मागणी करणा-या तरुण बेरोजगारांना योग्य ते प्रतिसाद मिळत नसल्याने मा.जिल्हाधिकारी साहेबांनी औसा शहरातील व परिसरातील बॅंक शाखांना केद्र सरकारच्या मुद्रा योजनेखालील कर्जाची मागणी करणा-या तरुण बेरोजगारांना कर्ज वाटप करण्याची सुचना करावी. या मागणीसाठी विलासराव देशमुख युवा मंचचे खुंदमिर मुस्तफा मुल्ला यांनी निवेदन सादर केले आहे.या निवेदनावर खुंदमिर मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.