एकदशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यास तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी द्या :इम्तियाज़ जलील
औरंगाबाद ख़य्युम पटेल प्रतिनिधी
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता सर्वच धर्माच्या भाविकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि सरकारला आवश्यक ते सगळे सहकार्य केले होते. आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक परंपरेत खंड पडू नये म्हणुन शासनास सहकार्याची भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन आणि जुन्या परंपरेनुसार महाराष्ट्रातील वारकरी पायी दिंडीव्दारे वारकऱ्यांसह पंढरपुर येथे वारी करून एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरीक दरवर्षी हा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात तसेच मोठ्या उत्साहाने दिंडीचे स्वागत करतात. वारकऱ्यांना पायी वारी करण्यासाठी दिंडीत सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि कायदेशिर कार्यवाही करुन अटक करण्याचा प्रकार निंदनीय आहे.
श्री गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असुन त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. महाराष्ट्रातील गणेशमुर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी व त्यावर अवलंबुन असलेल्या वस्तूंची विक्री करणारे व्यापाऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे उदरनिर्वाह गणेश उत्सवावरच अवलंबुन असते. गणेश उत्सव आनंदमय वातारवणात व्हावे व सर्वांना गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य वेळेवर व शांततामय वातावरणात उपलब्ध व्हावे म्हणुन वर्षभर आकर्षक गणेशमुर्ती व त्यासाठी लागणारे साहित्य बनविण्याचे अनेक जण काम करीत असतात. गणेश भक्तांना उत्साहात व परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्यास त्यांचे आनंद व्दिगुणीत होईल आणि छोट्या व्यापाऱ्यांना त्यांनी वर्षभर केलेले परिश्रम सार्थक ठरतील. अधिक उत्साहामध्ये हा सण साजरा करण्यासाठी गणेश भक्तांना मोठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुध्दा होणार आहे.
ईद-उल-अजहा (बकरी ईद) चे मुस्लिम समाजामध्ये अत्यंत महत्वाचे सण असुन अनेक कालखंडापासुन संपुर्ण जगासह राज्यात धार्मिक रितीरिवाज व परंपरेनुसार एकाच पध्दतीने मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. बकरी ईद सणानिमित्त अनेक छोटे-छोटे व्यापारी, शेतकरी व त्यावर अवलंबुन असलेल्या वस्तूंची विक्री करणारे व्यापाऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे उदरनिर्वाह अवलंबुन
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर सुध्दा धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निबंध लादलेले असल्याने सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावलेले आहे.आपणास नम्र विनंती की, महाराष्ट्रातील सर्व धर्मिय भाविक शासनाच्या कोरोनासंबंधीचे नियमावलीचे कटाक्षाने व काटेकोरपणे पालन केले असुन पुढे हि करणार असल्याने एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाण्यासाठी जुन्या परंपरेनुसार दिंडीव्दारे पायी वारीची, गणेश उत्सव उत्साहात व आनंदमय वातावरणात तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी देवून महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करुन सहकार्य करण्यात यावे असे आव्हान सय्यद इम्तियाज जलील खासदार, औरंगाबाद यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याना पत्र लिहून पत्र द्वारा विनंती केली आहे पाहु या सरकार काय निर्णय घेते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.