गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे आदेश जारी
लातूर,दि.5(जिमाका):-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव सणा संदर्भात पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका /स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविंड- 19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळात करिता 04 फूट व घरगुती गणपती 02 फुटाच्या मर्यादित असावी.
यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातु संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवा करिता वर्गणी देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवनिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या परंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या करण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच त्यानंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860,साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षक पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.
वृत्त क्र.586 दिनांक:-5 जूलै 2021
जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.5(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 6 जूलै 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पहिला व दुसरा कोव्हीशिल्ड, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय चाकूर पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन,ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय रेणापूर पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सीन व पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
वरील संस्थेमधील दुसऱ्यामात्रेचे लाभार्थी संपले असतील तर पहिली मात्रा देण्यात येणार आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 6 जूलै 2021 रोजी कोवीशिल्ड / कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
*****
वृत्त क्र.587 दिनांक:-5 जूलै 2021
*महानगरपालिके मार्फत 18 वर्ष व त्यापुढील
वयोगटासाठीचे लसीकरण सात केंद्रावर होणार*
लातूर,दि.5(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 6 जूलै 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 वर्षे पुढील वयोगटासाठीचे फक्त दुसरा डोस मोफत कोविड लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
कोविशिल्ड लस उपलब्ध् नाही. त्यामुळे 18 ते 44 वर्षे व 45 वर्षापुढील वयोगटातील नागरीकांना कोविशिल्ड डोस उदया दिला जाणार नाही. कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील. ऑनलाईन बुकींग सायंकाळी 7.00 वा.चालू करण्यात येईल तरी जास्तीत जास्त नागरीकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण), लेबर कॉलनी लातूर,यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर, विवेकानंद चौक लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09) व कै.बब्रूवान काळे आयुर्वेद महाविद्यालय,भोई गल्ली लातूर येथे कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे.
18 वर्ष व त्यापुढील वयोगट कोव्हॅक्सीन फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. प्रमाण प्रत्येक केंद्रावर एकूण 100 डोसेस,ऑनलाईन 50 डोसेस, ऑनस्पॉट 50 डोसेस.
कोविड-19 लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास मनपा हेल्पलाईन क्र. 9158632333 यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.