कॉक्सिट बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळेची डीएसटी इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड

 

कॉक्सिट बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळेची डीएसटी इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड





 लातूर, दि. ५ - येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) मधील बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळेची डीएसटी इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड.
कॉक्सिट महाविद्यालय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना जॉब रेडी बनवण्यासाठी सदैव अग्रेसर आहे. महाविद्यालयातील एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळे या विद्यार्थीनीने नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे प्रिलिमनरी स्टडीज ऑन रिपरसिंग सेलिकॉक्सिब इन कॉम्बिनेशन विथ कुरकुमिन फॉर ब्रेस्ट कँसर ट्रीटमेंट या विषयामध्ये महाविद्यालय पुरस्कृत रिसर्च ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे. तसेच एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी परीक्षेमध्ये निकिताने ८३.५६ टक्के गुण घेऊन स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम स्थान मिळविले. त्यानंतर महाविद्यालयामार्फत या विद्यार्थीनीची एमआयएमएसआर मेडीकल कॉलेज, लातूर येथे रिसर्च असोशिएट म्हणून निवड झाली. ही नोकरी करीत असतानाच निकिताची डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी भारत सरकार कडून प्रदान करण्यात येणारी डीएसटी इन्स्पायर या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. या फेलोशिपच्या साह्याने तिला पी.एचडी.चे संशोधन कार्य पुर्ण करण्यासाठी दरमहा आर्थिक सहाय्य प्राप्त होईल. या अनुशंगाने महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. एम. आर. पाटील सर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे डॉ. बी. एस. नागोबा यांच्या हस्ते निकिताचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निकिताने महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार्‍या शिक्षण पद्धती, सुविधा आणि मार्गदर्शनामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख आय. ए. पाटील यांनी निकिताला पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या