*ओबीसी आरक्षना संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका संशयास्पद*
*-ओबीसी ब्रिगेड*
औसा प्रतिनिधी
ओबीसीच्या राजकीय आरक्षणा संदर्भात विधानसभेत महत्वपुर्ण ठराव संमत करत असताना काही राजकीय पक्षांनी गोंधळ घातला या गोंधळा मूळे त्यांची ओबीसी आरक्षणा बद्धलची भूमिका संशयास्पद झाली आहे.त्या मुळे ओबीसी ब्रिगेडची महत्वपूर्णऑनलाईन मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते या मीटिंग चा महत्त्वाचा उद्देश राजकीय आरक्षण बद्दल झालेल्या घडामोडी व ओबीसी ब्रिगेडची पुढील रणनीती या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत ठराव मंजूर करत असताना विधानसभे मध्ये गोंधळ घालणाऱ्या राजकीय पक्ष व आमदारांनचा निषेध वेक्त करण्यात आला,ओबीसी साठी मंडल आयोग लागू करण्यात आल्या नंतर ज्या पक्षांनी व्ही.पी.सिंघ चे सरकार पाडले तेच पक्ष आज ओबीसी साठी चक्का जाम आंदोलन करून ओबीसी चे डोके जाम करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचाही निषेध करण्यात आला,या संदर्भात लोकजागृती करून लोकां समोर सत्य परिस्थिती ठेऊन सत्याची जाणीव करून दिली जाईल असा ठराव मंजूर करण्यात आला,बैठकीचा शेवट महाविकास आघाडी सरकारचा ओबीसी राजकीय आरक्षणा बद्धल घेतलेल्या ठराव संमत केल्याबद्दल आभार वेक्त करण्यात आला, येणाऱ्या काळात ओबीसी ब्रिगेडचे कार्य अधिक आक्रमकतेने करण्याचे ठरले. या बैठकीचे नियोजन महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे यांनी केले,प्रमुख मार्गदर्शन प्रदेश अध्यक्ष नागोराव पांचाळ,मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी केले, आभार जिल्हा अध्यक्ष दिलीप पिनाटे यांनी मानले. बैठकीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यतुन मोठया संख्येने पदाधिकारी व ओबीसी बांधव शिवरामजी पांचाळ, बाळासाहेब पांचाळ , कोळी मलिकार्जुन, शंकर मर्दाने,संतोष पांचाळ इत्यादीउपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.