अन्यथा नगर परिषद वर कुत्रे सोडो आंदोलन करण्यात येईल:एम. आय. एम.

 अन्यथा नगर परिषद वर कुत्रे सोडो आंदोलन करण्यात येईल:एम. आय. एम.






औसा प्रतिनिधी , औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरीकांसाठी खुप मोठी समस्या झाली आहे. मोकाट कुत्र्यांपासुन लहान मुलांना जिवीतास धोका निर्माण झाला आहे व रात्री उशीरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत आणि त्यांची संख्या कमी करणे / किंवा यांच्या वाढत्या वंशास आळा घालणे खुप गरजेचे आहे. कुत्र्यांच्या या वाढत्या संख्येने लहान मुलांना व वृध्द माणसांवर जिवीतास धोका निर्माण झाला आहे.

तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा एम. आय. एम. च्या वतीने नगर परिषद वर कुत्रे सोडो आंदोलन करण्यात येईल ह्याची आपण नोंद घ्यावी. असी चेतावनी 

सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम. आय. प्रमुख, औसा. यानी निवेदन देऊन केली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या