शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी
बचत गटांचा सहभाग महत्वपूर्ण
*विविध शासकीय विभागाची समन्वय सभा संपन्न
लातूर,दि.14(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीने ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येत असतात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून या योजना पात्र व गरजू पर्यत पोहचाव्या यासाठी उमेदच्या बचत गटाच्या सहभाग खूप महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. दि.9 जुलै रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कृतिसंगम समन्वय बैठकीत यांनी उपस्थित सर्व विभागाच्या विभाग प्रमुख व उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोननती अभियान अंतर्गत लातूर जिल्हयात बचत गटांचे मोठे जाळे तयार झाले असून गटांच्या माध्यमातून अनेक महिला विविध प्रकारचे वैयक्तिक व सामूहिक उद्योग व्यवसाय करीत आहेत. गटांतील कार्यरत गरजू महिलांनाकडून विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात चांगली मदत होईल याबाबत सर्व शासकीय विभागांनी या योजना राबविण्यासाठी उमेद अंतर्गत कार्यरत पात्र गट, ग्रामसंघ व प्रभाग संघाची प्राधान्याने निवड करण्यात यावी अशा विनंती वजा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांना दिल्या.
याबैठकीस कृषी विभाग, समाजकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग,जिल्हा महिला व बालकल्याण, जिल्हा उद्योग केंद्र तसेच इतर विभागाच्या प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी पोखरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व महिला बचत गटांना यामध्ये कोण कोणत्या योजनाचा लाभ मिळु शकतो. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून निधी वितरण, सबसिडी तसेच लाभार्थी हिस्सा व पात्रता याबाबत उपस्थित कर्मचारी यांच्या सोबत संवाद साधून कृषी विभागाकरून पात्र गटांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे अश्वासन दिले व पात्र गटांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.
प्रसंगी प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी जिल्ह्यात अनेक उत्कृष्ट गट कार्यरत असून या गटांकडून विवध शासकीय योजना राबविल्यास योजनांची उद्दिष्ट पुर्ती वेळेत होण्यास निश्चितच मदत होईल यासाठी पूर्ण उमेद कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. प्रारंभी जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी जिल्ह्यातील अभियानाची कार्यपद्धती व अभियानाची सद्यस्थिती याबाबत PPt च्या माध्यमातून सादरीकरण केले. या बैठकीचे यशस्वी नियोजन जिल्हा व्यवस्थापक अनिता माने, वैभव गुराळे यांनी केले. बैठीस सर्व तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.