अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर दावतपूर ग्रामस्थांचा घेरावा दिडशे ते दोनसे नागरिकांनी एकत्र येऊन केले दारु बंदी ची मागणी पोलीसांची मात्र बघ्याची भुमिका

 अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर दावतपूर ग्रामस्थांचा घेरावा 

दिडशे ते दोनसे नागरिकांनी एकत्र येऊन केले दारु बंदी ची मागणी पोलीसांची मात्र बघ्याची भुमिका 











औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील दावतपूर गावामध्ये अवैधरित्या पाच सहा जण दारु विकत आहेत दारू विकल्यामुळे गावातील लहान मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत गावामध्ये भांडण तंडे मध्ये वाढ झाली आहे.  गावा शेजारी शाळा असल्यामुळे शाळेमध्ये जावून दारु पिणारे नागरिक रिकाम्या बाटल्या तिथेच टाकत आहेत कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत शाळेमध्ये अनेक ठिकाणी रिकाम्या पडलेल्या बाटल्या ठिकठिकाणी दिसत आहेत अनेकवेळा पोलिसांना दारु विक्रेत्यांचे नाव सांगूण कारवाई करायला लावली पण अनेक थातूरमातूर कलम लावून दारु विक्रेत्यांना सोडूण दिले परंतु आज दावतपूर येथील दिडसे ते दोनसे नागरिकांनी दारु विक्रेत्यांच्या घरावर जावून दारु बंद करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले दारु मुळे गावामध्ये चौकातून जाणाऱ्या महिलेला जाता येत नाही कारण चौकामध्ये दारु पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

अवैध दारु विक्री करणाऱ्यांना नागरिकांनी चांगली तंबी दिली पून्हा दारू विक्री करु  नका असे सोचक विधान करण्यात आले त्यावेळी सरपंच विठ्ठल बेडजवळगे पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार तंटामुक्त अध्यक्ष उमाकांत पाटिल, मधुकर लांडगे, मुक्तेश्वर बेडजवळगे भगवान लांडगे, विजू बेडजवळगे, महादेव बिराजदार, बब्रुवान दाने,शिवदास कांबळे, अण्णासाहेब कांबळे सुदाम कुंभार ,राम बेडजवळगे ,सुरेश आप्पा बिराजदार ,राम बिराजदार आदि दिडशे दोनशे नागरीक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या