*कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खाजगी
रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवण क्षमता वाढवावी*
*प्रत्येक तालुक्यात रेफर रुग्णांसाठी सर्व आरोग्य सुविधायुक्त रुग्णवाहिका तयार ठेवावी*
*कोविडच्या चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी*
लातूर, दि.14(जिमाका):-कोविड च्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सीजन पुरवठ्याबाबत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकली असती; पण वेळीच नियोजन झाल्याने ती परिस्थिती टळली. त्या अनुषंगाने शासकीय स्तरावर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन क्षमता वाढवण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी ही संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून त्यांच्याकडील ऑक्सीजन साठवण क्षमतेत वाढ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविडच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स च्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, बाल रोग तज्ञ शिवप्रसाद मुंदडा, डॉ. संदिपान साबदे, डॉक्टर महिंद्रकर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांच्यासह जिल्हास्तरीय टास्क फोर्स चे सर्व सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय स्तरावर ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करण्यात आलेली आहे. तरी खाजगी रुग्णालयांनी हे त्यांच्याकडील ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. त्यांनी जंबो व डुरो सिलेंडर ची संख्या वाढवावी. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा कार्यालयानेही यामध्ये लक्ष घालून खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविणे बाबत मार्गदर्शन करावे. जेणेकरून संभाव्य तिसर्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास व ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्यास ही ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, असेही त्यांनी सूचित केले.
आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रेफरल रुग्णांसाठी एक सर्व आरोग्य सोयींनी युक्त अशी रुग्णवाहिका तयार करून ठेवावी. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी ही रुग्णवाहिका जुलै 2021 अखेर पर्यंत कार्यान्वित होईल याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्देशित केले. त्याप्रमाणेच वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कोवीडच्या चाचण्या कमी होणार नाहीत; यासाठी दैनंदिन चाचण्या घेण्याचे वेळापत्रक तयार करून त्या पद्धतीने त्या त्या गटातील चाचण्या घ्याव्यात असेही त्यांनी निर्देशित केले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ साठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण करावेत. हॅन्डस ऑन ट्रेनिंग जुलै 2021 अखेर पूर्ण झाले पाहिजेत याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय व खाजगी स्तरावर तयार करण्यात येत असलेल्या सुविधा बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून घ्यावी. तसेच आणखी काही आरोग्यसविधा वाढवण्याची गरज असेल तर त्याबाबत
कळवावे असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबत ची माहिती बैठकीत सादर केली. शासकीय व खाजगी स्तरावर एकूण 10 हजार बेडची उपलब्धता ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंबंधी तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने बालकांना व इतर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधी पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात बालकांसाठी किमान 200 ऑक्सिजन बेडचे उपलब्ध त्याचा ठेवण्याचे उद्दिष्ट दिलेले असून आरोग्य विभागाने शासकीय व खाजगी एकूण 540 ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे नियोजन ठेवलेले आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दहा याप्रमाणे एकूण 100, उपजिल्हा रुग्णालय 15, स्त्री रुग्णालय 20, सामान्य रुग्णालय उदगीर 25, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 50, एम आय टी लातूर 80, खाजगी बाल रुग्णालय एकूण 250 या पद्धतीने नियोजन आहे . तर जिल्ह्यात एकूण 105 आयसीयू बेड्स उपलब्ध करण्यात आल्याची माहिती डॉ. हरिदास यांनी दिली.
वृत्त क्र.622 दिनांक:-14 जूलै 2021
*महानगरपालिके मार्फत 18 वर्ष व त्यापुढील
वयोगटासाठीचे लसीकरण 9 केंद्रावर होणार*
लातूर,दि.14(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 15 जूलै 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 वर्षे पुढील वयोगटासाठीचे (कोव्हॅक्सीन- फक्त दुसरा डोस) मोफत कोविड लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
कोविशिल्ड लसीचा साठा अपुरा असल्यामुळे 18 ते 44 वर्षे व 45 वर्षापुढील वयोगटातील नागरीकांना कोविशिल्ड डोस उद्या दिला जाणार नाही. कोव्हॅक्सीन लसीचा पहीला डोस दिला जाणार नाही. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील. ऑनलाईन बुकींग सायंकाळी 7.00 वा.चालू करण्यात येईल तरी जास्तीत जास्त नागरीकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. कोविड-19 लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास मनपा हेल्पलाईन क्र. 9158632333 यांचेशी संपर्क करावा.असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका, मार्फत करण्यात येत आहे.
दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (Govt. I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09) व पं. जवाहरलाल नेहरु मनपा रुग्णालय पटेल चौक (दुपारी 12 ते सायं.5.00) लातूर येथे 18 वर्ष व त्यापुढील वयोगट कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. कोव्हॅक्सीन फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) (कोविशिल्ड लस उपलब्ध् नाही ऑनलाईन 50 टक्के ऑनस्पॉट 50 टक्के.
प्रमाण प्रत्येक केंद्रावर कोव्हॅक्सीन एकुण 100 डोसेस, ऑनलाईन 50 डोसेस, ऑनस्पॉट 50 डोसेस सकाळी 10.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत राहील, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
वृत्त क्र.623
जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.14(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 15 जूलै 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
ग्रामीण रुग्णालय देवणी येथे प्राधान्याने दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे प्राधान्याने दुसरा कोविशिल्ड, जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार दुसरा व पहिला डोस कोविशिल्ड, दुसरा व पहिला कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
वरील संस्थेमधील दुसऱ्यामात्रेचे लाभार्थी संपले असतील तर पहिली मात्रा देण्यात येणार आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 15 जूलै 2021 रोजी कोवीशिल्ड / कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
वृत्त क्र.624 दिनांक:-13 जूलै 2021
जिल्हयात 11 ते 24 जुलै 2021 दरम्यान
लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा
*लोकसंख्या स्थिरता पंधरवडा संकल्पना
लातूर,दि.14(जिमाका):-कुटुंब नियोजन पध्दतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करुन मागील दहा वर्षापासून राज्यामध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येत आहे. सध्या देशभरात कोविड-19 या आजाराचे संकट असले तरीही कुटुंब नियोजनाच्या सेवा नियमित सुरु ठेवणे गजरेचे आहे. कारण कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे एवढयापुरता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने जिल्हयामध्ये लोकसंख्या स्थिरता पंधरवडा 11 जुलै 2021 ते 24 जुलै 2021 दरम्यान राबविण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कुटुंब- नियोजनाच्या सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हा कार्यक्रम राबविताना कोविड-19 हा आजार टाळण्यासाठी राज्यस्तरावरुन देण्यात येणाऱ्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन तसेच कोविड-19 तपासणी अहवाल निगेटिव (NEGATIVE)असल्याची खात्री करुनच कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ.परगे यांनी देऊन यावर्षीचे जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य “संकट काळातही करुया कुटुंब नियोजनाची तयारी सक्षम देश व कुटुंबाची ही आहे संपूर्ण जबाबदारी” असल्याचे म्हटले.
लोकसंख्या स्थिरता पंधरवडा संकल्पना:- यादरम्यान कमी कालावधीच्या कुटुंब नियोजनाच्या पध्दती जसे निरोध, समिश्र गर्भनिरोधक गोळया, माला-एन, सेन्टक्रोमेन, आठवडी गर्भनिरोधक गोळया, छाया व जास्त कालावधीसाठी असणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या पध्दती जसे तांबी व गर्भनिरोधक इंजेक्शन, अंतरा, या साधांनाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. याचबरोबर कुटुंब नियोजनाच्या (स्त्री व पुरुष) नसबंदी शस्त्रक्रीयेवरही भर देण्यात येणार आहे.या सर्व कुटुंब नियोजनाच्या पध्दती सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध् आहेत. तरी संबंधित लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पार पाडण्यात आले. उद्घाटप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी बरुरे, डॉ.अर्चना पंडगे, डॉ. मोनिका पाटील, डॉ. सतीश हरिदास, डॉ. वाघमारे, डॉ. धुमाळ, डॉ. सारिका देशमुख उपस्थित होते.
****
वृत्त क्र.625 दिनांक:-13 जूलै 2021
कृषि विभागातील अधिकारी यांनी गाव दत्तक घेवुन विकास साधावा
विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांचे आवाहन
लातूर,दि.14 (जिमाका) लातुर तालुक्यातील हरंगुळ खु येथे 12 जूलै 2021 रोजी कृषि विभागामार्फत चला जाऊ शेतावर मार्गदर्शन करु पिकावर या नविन संकल्पनेवर कृषि विभागातील सर्व अधिकारी यांनी एका गावाची निवड करुन ते गाव दत्तक घ्यावे त्या गावात कृषि विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी पणे अमलबजावनी करावी.तसेच कृषि विभागाच्या सर्व योजना सर्वसामान्य शेतक-यापर्यत पोहचतील या पध्दतीने नियोजन करावे. तसेच शासन व शेतकरी यांच्यात समन्वय साधण्याचे काम करावे असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले.
लातूर तालुक्यातील हरंगुळ खु. येथे कृषि विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.त्या अंतर्गत विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी कृषि विभागातील कृषि पर्यवेक्षक ते जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रत्येकी एक कृषि समृध्द गाव दत्तक घेवुन गावांचा विकास अशाप्रकारे साधता येईल या बाबत मार्गदर्शन केले. तसेच हरंगुळ खु हे कृषि समृध्द गाव मी स्वत: दत्तक घेत आहे असे सांगीतले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शेतक-यांना कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन गावांचा विकास कशाप्रकारे साधता येईल याबबत मार्गदर्शन केले.यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम,तालुका कृषि अधिकारी महेश क्षीरसागर,सरपंच दादाराव पवार,सचिन बावगे,सचिन साळुंके,पल्लवी बायसठाकुर उपस्थित होते.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शिवाजी झुंजे,अरुण पाटील, महादेव बिडवे, अंतरावम बिडवे, विनायक झुंजे व इतर शेतक-यांची उपस्थिती होती.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.