ऑल इंडिया मूस्लिम ओ.बि.सि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षशब्बीर अंसारी आज औशात
मुस्लिम ओबिसि समाजाच्या समस्यांवर विचार विमर्श करून पुढिल दिशा ठरवण्यात येईल.
औसा: दि.१४ - ओबिसीचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यामुळे ऑल इंडिया मूस्लिम ओ.बि.सि संघटनेने दि. १५ जूलै २०२१ रोजी दूपारी २:०० वाजता शासकीय विश्राम ग्रह औसा येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या उपस्थितित जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकित मुस्लिम ओ बी सी समाजाच्या समस्यांवर विचार विमर्श करून पुढिल दिशा ठरवण्यात येईल. तालुकाध्यक्ष डॉ. वहिद खुरेशी यांनी या बैठकीचे आयोजन केले असुन जिल्ह्यतिल संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कलिमोद्दिन अहमद शेख यांच्या द्वारे कळविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.