*उस्मानाबाद शहरात आत्मनिर्भर भारत, मार्गदर्शन केंद्रांतर्गत पी. एम. स्वनिधी योजना एकदिवशीय शिबीराचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*
प्रतिनिधी/ उस्मानाबाद, अल्ताफ शेख
उस्मानाबाद : भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून पी. एम. स्वनिधी महत्वपुर्ण योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजु व्यावसायिकापर्यंत पोहचविण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्रांतर्गत पी. एम स्वनिधी योजना एकदिवशीय शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.या शिबीराचे आयोजन जुने राम मंदिर, महाजन गल्ली उस्मानाबाद याठिकाणी करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन शिबीराचे जिल्हा संयोजक सचिन लोंढे यांनी योजनेविषयी विषयी सविस्तर माहिती देतांना सांगीतले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून पी. एम. स्वनिधी योजनेची सुरुवात मागील वर्षी करण्यात आली. गेल्या दीड वर्षापासुन कोरोना महामारीने थैमान घातले असुन त्यामुळे छोटे व्यवसायीकांची आर्थिक घडी पुर्णपणे विस्कटलेली आहे. त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी, किरकोळ भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले, छोटे व्यावसायिक बँकेमार्फत आत्मनिर्भर होण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपये (भांडवल) विनातारण कर्ज या योजनेतून मिळत आहे, आणि त्याची कर्जाची परतफेड वेळेवर केली गेली तर पुन्हा 20000/- रुपये नवीन कर्ज भेटणार असल्याचेही सांगितले, आणि त्यामुळे छोटे व्यावसायिक यांच्या उद्योग धंद्याला चालना मिळणार आहे व त्यांची आर्थिक घडी सुरळीत होणार आहे, या करिता मोजक्या कागदपत्रांच्या आधारे (आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक,) हे कर्ज वितरण केले जात असल्याचे लोंढे यांनी सांगीतले.
तसेच याप्रसंगी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की केंद्र सरकारद्वारा राबविण्यात येत असलेल्या पी. एम. स्वनिधी योजनेचा लाभ हा आता पर्यंत अनेक लोकांना झाला आहे आणि गरीब लोकांना या योजनेमुळे आत्मनिर्भर होण्यासाठी मदत आणि प्रोत्साहन भेटत आहे त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व इतरानांही योजनेचा लाभ घेण्यास सांगावे असे आवाहन केले.
हे एकदिवशीय शिबीर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या संकल्पनेतून व युवा नेते सुरज शेरकर यांच्या पुढाकाराने शहरात राबविण्यात आले.
या प्रसंगी आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबीरात 90 लाभार्थ्यांनी नोंदणी केली व दिवसभरा मध्ये 450 लोकांनी या योजनेची माहीती घेतली. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजमुयो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रविण सिरसाठे, सुरज शेरकर, नागेश जगदाळे, सलमान शेख, गणेश एडके, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, प्रसाद राजमाने, किशोर पवार, मंगेश आयचीत, राज नवले, धंनजय जाधव, बालाजी इंगळे, व युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्याच बरोबर शहरातील व ग्रामीण भागातील छोटे व्यवसायीक मोठया संख्येने या शिबीराचा लाभ घेण्यासाठी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.