बकरी ईदनिमित्त महाराष्ट्राच्या सीमेवर येणाऱया बकरे वाहतूक व जनावर वाहतूक यांना प्रवेश देण्यात यावे व गाड्यांना ताटकळत ठेवू नये - राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
उस्मानाबाद/प्रतिनिधी, अल्ताफ शेख,
21 जुलै रोजी बकरी ईद हा सण येत आहे मागील वर्षी बकरी ईद वेळी कोव्हिड 19 मुळे महाराष्ट्र शासनाने राज्याच्या सीमेवर नाकाबंदी केली होती या नाकाबंदीदरम्यान हैदराबाद, गुजरात,मुंबई, आंध्र प्रदेश,मध्य प्रदेश इ. सीमेवर ट्रक अडवणुक केल्याने अनेक बकरे मरण पावल्याची घटना घडली यामुळे या व्यवसायाशी निगडित असलेले शेतकरी वाहतूक व्यावसायिक व खरेदी करणारे मुस्लीम समाज यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला.
बकरी ईद मध्ये जी कुर्बानी केली जाते यामधील मोठा भाग गरिबांना दिला जातो यामुळे अशा संकटसमयी गरिबांना मदत होते या कारणास्तव आपणास विनंती आहे की 21/07/21 रोजी बकरी ईद असल्याने महाराष्ट्राच्या सीमेवर बकरे वाहतूक करणार्या गाड्यांना विनाकारण ताटकळत न ठेवता कोव्हिड नियमांची तपासणी करून तात्काळ गाड्यांना सोडण्यात यावे तसेच मागील वर्षांप्रमाणे शेतकर्यांचे जसे नुकसान झाले तसे यावर्षी नुकसान होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशा सूचना प्रशासनास देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तर्फे उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी तरी मुख्यमंत्री साहेबांनी जनावरे व बकरे वाहतुक करणारया वाहतुकींना सिमाबंदी करू नये अशा आशयाचे निवेदन उस्मानाबाद जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सज्जाद नोमानी सहेब यांच्या आदेशान्वये समाजसेवक शाहनवाज़ सय्यद ,सद्दाम मुजा़वर ,नुर खान, सरफराज़ शेख,नोमान रज़वी, वाजीद तांबोली, अतिक शेख व अशपाक शेख हे उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.