भीम आर्मी काढणार मातोश्री वर निषेध मोर्चा.
मातोश्रीवरून दंगली भडकवल्या जातात का? मुख्यमंत्र्यांची सुद्धा चौकशी करावी.
चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार गायकवाड यांच्या मतोश्रीवरील संभाषणाची चौकशी झाली पाहिजे - अशोक कांबळे, मा:महाराष्ट्र प्रमुख,राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी.
मुंबई प्रतिनिधी:-
संजय गायकवाड़ हे बुलढाणा विधानसभेचे शिवसेने चे आमदार असून खामगाव च्या दलित अत्याचार प्रकरणात येऊन गुंडा सारखी चिथावणीखोर भाषा वापरत आहेत. लोकप्रतिनिधी ला हे शोभते का? विशेष म्हणजे हा शिवसेना आमदार एवढ्यावरच थांबला नाही, तर पुढे बोलतांना मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता मातोश्रीवरून मला फोन आलाय, म्हणून मी इथं आलोय. तसेच गृहराज्यमंत्र्यांचा देखील स्पष्ट उल्लेख त्यांच्या व्हायरल व्हीडिओ मध्ये करण्यात आल्याचे दिसतंय. यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याचं सांगण्यावरून हा आमदार ऍट्रॉसिटी कायद्याला विरोध करून राज्यात आणि देशात जातीय दंगली घडविण्याचा हा सरकारचा मोठा डाव होता का? मातोश्री वरून जर या आमदाराला कॉल आला तर मुख्यमंत्री आणि या आमदारांच्या संभाषणाची रेकॉर्डिंग काढून सोबत मुख्यमंत्र्यांची व गृहराज्यमंत्र्यांची सुद्धा चौकशी करावी आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
अस्त्र-शस्त्रासह १० हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन. कुणी ऍट्रॉसिटी करत असेल तर तुम्ही सुद्धा समोरच्यावर खोटे रॉबरीचे गुन्हे दाखल करा, ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात 2 दिवसात जमानत होऊन जाईल, पण रॉबरीच्या गुन्ह्यात 3 महिने सुद्धा यांची जमानात होणार नाही. त्याठिकाणी कोणता ठाणेदार गुन्हा दाखल करत नाही ते आम्ही बघून घेऊ असे चिथावणीखोर वक्तव्य केलं. तसेच शस्त्र घेऊन 10 हजार लोकांची फौज घेऊन येईल म्हणजे यांच्या कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आलीत कुठून याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि आर्म्स ऍक्ट नुसार सुद्धा गुन्हा देखील झाला पाहिजे.
अश्या बेलगाम आमदारावर त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करतील का ? कारवाई न केल्यास संजय गायकवाड याला भीम आर्मी बुलढाण्यात फिरू देणार नाही आणि अधिवेशनात येणार असतील तर त्यांना मुंबईत सुद्धा पाय ठेवून देणार नही जिथे दिसेल तिथेच चोप देण्यात येईल...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.