नगराध्यक्ष Dr. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली आज औसा येथे इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध दर्शवत आंदोलन

 






राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष Dr. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली आज औसा येथे इंधन दरवाढीच्या विरोधात  केंद्र शासनाचा निषेध दर्शवत आंदोलन करण्यात आले. *पेट्रोल-डिझेल तसेच गॅसचे सतत वाढत असलेले भाव* यांचा यावेळी निदर्शने करत विरोध दर्शवण्यातआला.

यावेळी *मोटार गाडीस दोरीने पेट्रोल पंपा पर्यंत ओढत नेत* कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी मा.नगराध्यक्ष जावेद शेख, मा.नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, मा.नगराध्यक्ष मेहराज शेख, पाणी पुरवठा सभापती गोविंद जाधव, नगरसेवक रुपेश दुधनकर, शाकेर सय्यद,साजीद काझी,विनायक सूर्यवंशी,फहाद अरब,जेष्ठ नेते डॉ.नजीर शेख,युनूस चौधरी, विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष वकील इनामदार, युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके, युवक शहर अध्यक्ष संतोष औटी,युवक शहरकार्याध्यक्ष  संगमेश्वर उटगे,सेवादल शहर अध्यक्ष कृष्णा सावळकर, ऍड.अजिंक्य फत्तेपुरकर, मुकेशसिंग तोवर,सुमित दीक्षित, गजेश्वर शिंदे,आनंद बनसोडे,विजय कांबळे,बिलाल सिद्दीकी,अल्ताफ सय्यद,मिनाज इनामदार इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या