मुख्यमंत्री महा-आरोग्य् कौशल्य् प्रशिक्षण कार्यक्रम ” – मोफत कौशल्य् प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

 “ मुख्यमंत्री महा-आरोग्य् कौशल्य् प्रशिक्षण कार्यक्रम ” – मोफत कौशल्य् प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.




अल्ताफ शेख,प्रतिनिधी/ उस्मानाबाद  

राज्यात कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे आरोग्य् यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे आरोग्य् क्षेत्रात आवश्य्क कुशल मनुष्य्बळाची कमतरता जाण्वत आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने “मुख्यमंत्री महा-आरोग्य् कौशल्य् प्रशिक्षण कार्यक्रम” या योजनेची सुरूवात केली आहे. या प्रशिक्ष्ण योजनेच्या माध्यमातुन उस्मानाबाद जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना आरोग्य् क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध् होणार असून जास्तीत जास्त् उमेदवारांनी “मुख्यमंत्री महा-आरोग्य् कौशल्य् प्रशिक्षण कार्यक्रम” योजनेत सहभागी होण्यासाठी यासेाबत दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती भरावी असे आवाहन, सहायक आयुक्त्, जिल्हा कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.  

Google Form Link - https://forms.gle/3f4DGZhHKG2oPDzC9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या