आ.संजय गायकवाडांनी थोबाडं सांभाळून भाष्य करायला पाहिजे अशा बेताल वक्तव्याचा निषेधच : उत्तरेश्वर कांबळे
करमाळा प्रतिनिधी : अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात ( अॅट्रासिटी) च्या नावानेच काही जातीयवादी लोकांना पोटशूळ उठत असुन बुलढाण्याचे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर अकलेचे तारेच तोडले.
अॅट्रासिटी दाखल करण्यात आली तर तुम्ही त्याच्यावर राॅबरीचे गुन्हे दाखल करा
पोलिसांनी नाही गुन्हा दाखल केला तर मला सांगा मी लगेच 10 हजार लोकांची फौज घेऊन येतो
असे बेताल वक्तव्य करून गरळ ओकली आहे.
त्यांनी असे बेताल वक्तव्य थोबाडं सांभाळून करायला हवं होतं.या अशोभनीय वक्तव्याचा भीम आर्मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत असुन संजय गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणी यापुढे गायकवाडांनी तोंड सांभाळून भाष्य करावे अन्यथा गायकवाडांचा घरी घेऊन समाचार घेईन असे. भीम आर्मीचे आक्रमक महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे म्हणाले ते प्रतिनिधींशी बोलत होते.
आधिक बोलताना कांबळे म्हणाले की पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात रोजच्यारोज अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असुन त्यावर मुक्याची भुमिका पार पाडणारे संजय गायकवाड सारखे लोकं दोन समाजात जातीय दंगल भडकविण्याचा प्रयत्न करतं आहेत.
गायकवाडांनी 10 हजार बगलबच्चे घेऊन यावे आणी हिंमत असेल तर माझ्यावर राॅबरीची केस दाखल करावी असे. ही उत्तरेश्वर कांबळे म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.