तालुकास्तरीय पीक स्पर्धेत तुकाराम पंडगे यांचा सन्मान...
औसा/ प्रतिनिधी : - औसा तालुका पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पीक स्पर्धेत हरभरा पिकाचे दर्जेदार आणि भरघोस विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल सेलू विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तुकाराम पंडगे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्याच्या कृषी विभागाच्या निर्देशानुसार रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सन्मानपूर्वक तिन्ही पिकासाठी देण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती अर्चना गायकवाड, गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी सेलूचे कृषी सहाय्यक ओम अंधारे आदीसह तालुक्यातील प्रशस्तीपत्रास व इतर शेतकरी उपस्थित होते. येथील रुपेश कारंजे या शेतकऱ्यांचा गहू पिकासाठी सन्मान करण्यात आला. तुकाराम पंडगे हे प्रयोगशील शेतकरी असून रब्बी हंगामात हरभरा पिकाचे विक्रमी उत्पन्न काढल्याबद्दल औसा तालुक्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. तुकाराम पंडगे आणि चालू खरीप हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड करून शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे कार्यक्रमास पंचायत समिती व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.