पंचायत समितीच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार

 

पंचायत समितीच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार

 औसा (प्रतिनिधी)दि.३

डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 1991 साली सुरू झालेल्या डॉक्टर्स डे निमित्त  औसा पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील डॉक्टरांचा शाल श्रीफळ पुष्पहार आणि प्रशस्तीपत्र देऊन शुक्रवार दिनांक २ जुलै रोजी सत्कार करण्यात आला .पंचायत समिती सभापती अर्चना गायकवाड, उपसभापती राजश्री काळे,गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ,दत्तात्रय कोळपे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संतोष सोमवंशी, जि प सदस्य नारायण लोखंडे, नगराध्यक्ष अफसर शेख आदी मान्यवरांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. औसा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवेचे सतत चांगले काम करतात  म्हणून औसा पंचायत समितीच्या वतीने डॉक्टर्स डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार मूर्ती च्या वतीने काही डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर्स डे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंचायत समितीला धन्यवाद दिले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य सौ त्रिवेणी काळे, रेखा नागराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंगद जाधव, तालुका ' आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेख यांच्यासह पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या