*पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गोल्हार यांना निलंबित करा !*
*जखमी काळवीटाला वाचवायचे सोडून डॉक्टर सांगत बसले कायदा ?*
लातुर : दि. ३ - लातूर ते शिरूर अनंतपाळ या मार्गावर आरी मोडच्या जवळ रस्त्यावरुन जात असलेल्या एका कारवर शेतातून पळत आलेले काळवीट कारवर आदळल्याने कारचे नुकसान होऊन काळवीट जखमी झाले.
काळवीट एवढ्या वेगात येऊन कार वर आदळले की त्यामुळे चालकाच्या बाजूचा खिडकीचा पूर्ण काच फुटून साईड ग्लास पण तुटला. आणि समोरच्या काचाला ही मार बसला. तसेच तुटलेला साइड ग्लास मागच्या सीटवर बसलेल्या एका महिलेच्या कपाळावर लागून त्यांना ही जबर जखम झाली. लातूर येथील दंतवार परिवार या कार मधून उदगीर येथे लग्नाला जात असताना हा अपघात घडला.
याच मार्गे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे हे पण उदगीर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना रस्त्यातील ही घटना पाहून, तेथेच बाजूला गाडी थांबवून जखमींची व घटनेची चौकशी केली. जखमी झालेल्या काळविटाचे मागील दोन्ही पाय अपंग झाल्याचे दिसून आल्याने काळवीटाचा प्राण वाचवण्यासाठी शिरूर आनंतपाळ येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गोल्हार यांना मोबाईलवरून संपर्क करून सदरची घटना कळवून काळविटाचा प्राण वाचविण्याची विनंती केली. मात्र डॉक्टर गोल्हार यांनी अत्यंत बेजबाबदारपणे मला वनीकरण विभागाने बोलावल्या शिवाय येता येत नाही. असे सांगून येण्यास टाळाटाळ केली. त्याच वेळी लोकाधिकारप्रमुख पनाळे यांनी शिरुर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना मोबाईल वरून या घटनेची माहिती देताच पनाळे साहेब आपण तेथेच थांबा, मी आलोच असे सांगून अवघ्या दहा मिनिटात पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोंचले. आणि जखमी काळवीटाला घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर आणण्याची व्यवस्था केली.
मात्र पशुवैद्यकीय अधिकारी आपण जनावरांचे पशु प्राण्यांचे डॉक्टर असल्याचे विसरून जाऊन अत्यंत नालायकपणाचा त्यांनी कळस केला. डॉक्टर गोल्हार यांना पुन्हा फोन करून व्यंकटराव पनाळे यांनी आपला परिचय सांगून, आपण कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणा करत असल्याची आपल्या वरिष्ठाकडे तक्रार केली जाईल असे सांगितल्यानंतर एक तासांनी डॉक्टर घटनास्थळी आले. आणि तेथे येऊन पण मला वनीकरण विभागाच्या परवानगीशिवाय या काळवीटावर विलाज करता येत नाही असे सांगू लागले. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आपण जखमी काळवीटावर उपचार करा असे सांगितल्यावर त्यांनी पुढील उपचार केला. अशा निर्दयी आणि बेजबाबदार पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोल्हार यांच्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी व त्यांना सेवेतून निलंबित करावे. अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी त्यांच्या वरिष्ठाकडे केली आहे. तसेच वेळेवर येऊन काळविटाचा प्राण वाचवण्यास मदत केल्याबद्दल शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.
लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी अपघातस्थळी दाखवलेली सतर्कता त्यामुळेच काळविटाचे प्राण वाचू शकले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.