राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - एचएससी बोर्डाच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद*


 *राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - एचएससी बोर्डाच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला*




 तुम्हाला माहिती असेल - महाराष्ट्र सरकारने यापूर्वी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे बारावीचा निकाल कसा लागेल विद्यार्थी या चिंतेत आहेत 


 मात्र आता शालेय शिक्षण विभागाने - बारावी निकालाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे, यानुसार सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे


*कसे होणार मूल्यमापन ?*


▪️ दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)


▪️ 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)


▪️ 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि तत्सम मूल्यमापन गुण (40%)


दरम्यान दहावीसाठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे - या सूत्रानुसार शिक्षण मंडळा कडून मूल्यमापन करण्याचे आदेश - महाविद्यालयांना देण्यात येतील


*शालेय शिक्षण विभागाने* - दिलेली माहिती, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या