हावीच्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार -------------------------------------------------------- श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के

 

दहावीच्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार 
--------------------------------------------------------
श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा 
दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के






लातूर, दि. १७ : येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के   लागला आहे. सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण  संपादन करण्यात यश मिळवले आहे.  एकूण ११४ पैकी तब्बल ७० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक  गुण  मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा  तुरा रोवला आहे. या सर्व गुणवंतांचा शनिवारी  गुलाब पुष्प देऊन व पेढे भरवून  मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. 
मागच्या सलग दहा वर्षांपासून श्रीकिशन सोमाणी विद्यालयाने आपला  दहावी परीक्षेच्या निकालाचा आलेख कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. दहा पैकी आठ वर्षे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ६१. ४० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. ७५ ते ८९ .९ टक्के गुण  मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३६ असून ६० ते ७४ . ९ टक्के गुण  मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची  संख्या ०८ आहे. या परीक्षेत कु. तेजल  अनिलकुमार तापडिया, कु. सृष्टी राजाराम सदानंदे, कु. राजनंदिनी बाळासाहेब जाधव, कु. जोगेश्वरी धोंडिबा माने, महेश सूर्यकांत माने व कु. जान्हवी धोंडीराम मासाळे  या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण  संपादन केले आहेत. विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये, १२ विद्यार्थ्यांनी गणितात, ०८ विद्यार्थ्यांनी विज्ञानामध्ये तर २१ विद्यार्थ्यांनी इतिहास - भूगोल- नागरिकशास्त्रात  पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. 
 दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा शनिवारी सायंकाळी   संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, अतुल देऊळगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन पेढा भरवून  त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व गुणवंतांचे  कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी व उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
यावेळी गुणवंत विद्यार्थी कु. तेजल  तापडिया, कु. श्रेया वाघमारे, चंद्रप्रिय शिरुरे , कु. गौरी पाटील, सुमित नागलगावे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  तनुजा देशपांडे यांनी तर  आभार प्रदर्शन सुनीता जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करीत हा सत्कार सोहळा पार पडला. 
-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या