के .बी. हसीना उर्दू गर्ल हायस्कूलचा 100 % निकाल जाहिर
औसा प्रतिनिधी औसा येथील कादरिया एज्युकेशन सोसायटी औसा द्वारा संचलित के. बी .हसीना उर्दू गर्ल्स हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले आहे. मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेतून 44 पैकी 42 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह आणि दोन विद्यार्थिनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यशाची उज्वल परंपरा राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव कादरी मुख्याध्यापिका शबाना फातेमा कादरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.