हरंगुळ बु. च्या गोविंदनगरात दोन तरुण मुलींची आत्महत्या - दोन्ही मुलींना फूस लावून पुण्याला पळवून नेले होते - बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली

 हरंगुळ बु. च्या गोविंदनगरात दोन तरुण मुलींची आत्महत्या

- दोन्ही मुलींना फूस लावून पुण्याला पळवून नेले होते

 -  बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली

- आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार



लातूर पासून 2 किमी अंतरावर असलेल्या हरंगुळ बु. च्या गोविंदनगरमध्ये दोन तरुण माहाविध्यालयीन तरुण मावस बहिनीने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी दि. 3 जुलै रोजी घडली.

गोविंदनगर  येथील दत्तात्रय बनसोडे यांची मुलगी आणि त्यांचे साडभाऊ संतराम क्षीरसागर यांच्या मुलीला लातुरात राहणाऱ्या पंकज सुतार याने नोकरीला लावतो म्हणून पुण्याला 18 जूनला घेऊन गेला. तिथे हडपसरला रूम घेऊन देऊन किराणा भरून दिला आणि पैसे देखील दिले. या मुलींचा त्याने गैरफायदा घेतला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून या मुलींना पोलिसांनी आरोपीच्या गाडीतूनच आणण्यात आले. या मुलीची वैध्य कीय तपासणी करण्यात येणार होती. त्या आधी आज 3 जुलै रोजी या दोन्ही मुलींनी एकाच साडीला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   


आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही


या प्रकरणातील मुलींना फूस लावून पळवून नेणारा मुख्य आरोपी पंकज सुतार यास अटक होईपर्यंत आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलीच्या वडिलांनी घेतली आहे.

हाफेज खय्युम शेख Latur reporter News

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या