ब्रेकिंग न्युज
शेळया चारतांना पोहण्यास गेलेल्या तिन भावंडाचा नदीत बुडून मृत्यु.
सुनेगाव सेंद्री नदी पात्रात पोहण्यास गेलेल्या सख्या बहीन भाऊ व चुलत भाऊ आशा तिन जनाचा बुडून मृत्यु.
अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सेंद्री येथील दोन सख्या भावाचे व चुलत भाऊ या तिन बहीन भावाचा जवळच्याच नदी पात्रात पोहण्यास गेले असता त्यात त्यांचा बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रवक घटना घडली आहे.
यात ज्ञानोबा विश्वनाथ जायभाये यांची मुलगी रोहीनी ज्ञानोबा जायभाये वय १३ वर्षे व त्यांचा मुलगा प्रतिक ज्ञानोबा जायभाये वय१० वर्षे हे सख्ये बहीन भाऊ मयत झाले आणि तुकाराम विश्वनाथ जायभाये यांचा मुलगा गणेश तुकाराम जायभाये वय१० वर्षे हा चुलत भाऊ मयत झाला असून हे तिघे बहीन भाऊ शेतात शेळ्या चारत असतांना दुपारी १२.३० च्या दरम्यान पोहता येत नसतांना पोहण्यासाठी नदी पात्रात जाऊन त्यांचा मृत्यु झाल्याचे गंगाहिप्परगा तलाठी सज्जाच्या तलाठी राही सोनवणे यांनी माहीती दीली. या घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी व सरपंच सुधाकर जायभाये व मयतांचे नातेवाईक, गावकरी उपस्थित होते.
खय्युम शेख Latur reporter News अहमदपुर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.