सरपंच मानधनवाढ प्रश्न विधान सभेत मांडणार आमदार कैलास पाटील*

 *सरपंच मानधनवाढ प्रश्न विधान सभेत मांडणार आमदार कैलास पाटील*





दि 3 - उस्मानाबाद - सरपंचांना अनेक समस्या आहेत, गावस्तरावर प्रत्येक अडीअडचणींत सरपंच यांना तोंड द्यावे लागते, या सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गावांची प्रतिनिधित्व केले जाणार आहे, आगामी काळात सरपंचांच्या मानधनाचा विषय विधानसभेत मांडून सरपंचांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले,

जिल्हा परिषद उस्मानाबाद यशवंतराव सभागृह मध्ये आज सरपंच परिषद राज्यस्तरीय विस्तार मेळावा झाला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 


मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी दिनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, 

सरपंच परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की गाव विकासाचा पाया हा सरपंच असतो सामाजिक दायित्व पत्करून सेवावृत्ती जोपासत कार्य करावे लागते कसरत व काटेरी असते ती गाव सरपंच निवडणूक, त्यामुळे गाव समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र काम सरपंचांना करावे लागते यावेळी बोलतांना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी राज्यातील सरपंचाच्या समस्या व सरपंच मानधन वाढीबाबत आमदार कैलास पाटील यांना हा प्रश्न उपस्थित करून सरपंचांना त्यांच्या हक्काचे प्रश्न व न्याय देण्यासाठी त्यांना विनंती केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, डॉक्टर प्रताप सिंह पाटील, ज्ञानेश्वर वायाळ, सौ जीनत सय्यद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, धनश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर प्रताप सिंह पाटील, प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र बागुल, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सहसचिव सुशील थोर, महिला प्रदेशाध्यक्ष सौ झीनत सय्यद, जि प सदस्य संदीप, जिल्हाध्यक्ष सुदीप हंगरगेकर आदींची उपस्थिती होती


*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या