मातृतुल्य व्यक्तीमत्व श्रीमती पठाण हानिफाबेगम सेवानिवृत्त..

 मातृतुल्य व्यक्तीमत्व श्रीमती पठाण हानिफाबेगम सेवानिवृत्त.. 


प्रा.शा.समदर्गा,केंद्र औसा व चक्रधर शाळा औशाच्या संयुक्त विद्यमाने निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन संपन्न.....








एस ए काझी 


औसा /प्रतिनिधी : - दि. 30 जून 2021 रोजी जि.प.प्रा.शाळा समदर्गा शाळेच्या मातृतुल्य,उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती पठाण हानिफाबेगम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम चक्रधर माध्यमिक विद्यालय औसा येथे विविध मान्यवरांच्या, उपस्थितीत पार पडला. यावेळी मॅडमचे कुटुंबीयांसह आदी जण उपस्थित होते. , मँडमचे सहकारी, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन अर्चनाताई गायकवाड, सभापती, पंचायत समिती औसा यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्ती जाधव, शिक्षणविस्तार अधिकारी, बीट औसा, व प्रमुख पाहुणे म्हणून अमर खानापुरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव, महाराष्ट्र तसेच महादेव खिचडे, चेअरमन, शिक्षक पतसंस्था औसा, शारअली, केंद्रप्रमुख औसा, संजय भोसले प्राचार्य, माधवराव भोसले हायस्कूल मातोळा, संजय जगताप सचिव, औसा शिक्षक पतसंस्था,महादेव खिचडे रेड्डी सर सचिव, अशासकीय पतसंस्था औसा, देशमाने केंद्रीय मु.अ.औसा, शाम भोसले प्रगतीशील शेतकरी मातोळा, बोयणे सरव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 अत्यंत गरिब परिस्थिती मध्ये जीवन जगत संस्काराच्या माध्यमातून हेवा वाटेल अशी संतती व संपत्ती निर्माण करून समाजात आदर्श निर्माण करणार्‍या श्रीमती पठाण मँडम यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक कार्याविषयी व त्यांना प्रतिकूल परिस्थितीत साथ देऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय वैभव निर्माण करणार्‍या शब्बीरभाई शेख सर पती यांच्या विषयी मौलिक विचार अमर खानापुरे, महादेव खिचडे, निवृत्ती जाधव, अर्चनाताई गायकवाड, नय्युम सय्यद, डी.एस.बिराजदार,श्रीमती.पुरी मँडम, मुरमे सर यांनी व्यक्त केले.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समदर्गा शाळेचे उपक्रमशील शिक्षक नवनाथ मेढे यांनी केले, तर सुत्रसंचालन दिपक डोंगरे यांनी तर आभार चक्रधर शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुलतान शेख सर यांनी मानले. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.प्रा.शाळा समदर्गा शाळेचा शिक्षक वृंद, औसा केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच चक्रधर शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी  खूप परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या