खरीप 2020 सालाचा पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा

खरीप 2020 सालाचा पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा: आत्माराम हरी मिरकले










औसा मुख्तार मणियार

2020 सालचा खरीप पिक विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट द्यावा अशी मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 2 जुलै 2021  शुक्रवार रोजी औसा तहसीलदार यांना एक निवेदन सादर केले आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे सन 2020 साली खरीप हंगामात पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. नंतर अजून मधून पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, व मूग पिके तरली होती. परंतु मूग आणि उडीद पिकाची कापणी पूर्वीच पावसामुळे नासाडी झाली. तसेच परतीच्या मान्सून मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन गंजीचे काड आणि शेतात उभे असलेल्या पिकात पाणी शिरल्याने सोयाबीन नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सतत लागलेल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी नुकसान झालेल्या पिकाचे फोटो काढून ऑनलाइन अर्ज करू शकले नाहीत. औसा तालुक्यात नुकसान झालेल्या व ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पिक विमा मंजूर झाला असून अनेक शेतकऱ्यावर घोर अन्याय झाला आहे. अनेक शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नाही तसेच अनेक शेतकरी (दिव्यांग) अपंग असल्याने स्मार्टफोन नसल्याने वेळेत शेतकरी नुकसान दाखवायला शिकले नाहीत. औसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप 2020 सालाचा सरसकट पिक विमा द्यावा. अशी मागणी औसा तहसीलदार यांना अपंग जनता दल सामाजिक संघटना चे जिल्हाध्यक्ष आत्माराम हरी मिरकले यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर शंकर सर्जे प्रदेश उपाध्यक्ष, आत्माराम मिरकले, गोविंद तावसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या