*नगरसेवक अपात्रतेचे प्रकरण स्वाधिकारात चालविणार*
दि - 15 - उस्मानाबाद -
*सुनावणीवेळी शिवाजी कापसे यांनीही त्यांच्या विधिज्ञामार्फत म्हणणे सादर केले. यामध्ये कापसे यांनी त्यावेळी नगराध्यक्षपदाचा गैरवापर केला असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु नगराध्यक्षपदाबाबतची तक्रार चालविण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना हे प्रकरण चालविता येणार नाही.*
*एखाद्या नगरसेवकाविरुद्ध तक्रार करावयाची असल्यास ती तक्रार त्या नगरसेवकाच्या मतदाराला करता येते. कापसे हे प्रभाग ७ मधून निवडून आले तर तक्रारदार मुंडे या प्रभाग क्र. ५ च्या मतदार आहेत त्यामुळे तक्रादारांची तक्रार कायदेशीर नसल्याचे कापसे यांच्यावतीने सांगण्यात आले.*
न. प. च्या मालकीच्या आरक्षण क्र. ३५ मधील इमारतीचा पहिला माळा व खुली जागा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी कापसे हे ते संचालक असलेल्या महाविद्यालयासाठी बेकायदा वापरत असल्याने त्यांना वक पदावरून अपात्र करावे, अशी तक्रार नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी केली होती. याची दखल घेत हे प्रकरण स्वाधिकार कक्षेत चालविण्याचा आंतरिम निकाल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे.
याबाबत नगराध्यक्षा मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत या बांधकामाच्या अनुषंगाने आजतागयत सदर ट्रस्टबरोबर भाडेपट्टा झालेला नाही. केवळ विनाधिकाराने या ट्रस्टचे संचालक शिवाजी कापसे है न. प. सदस्य असल्याने चुकीच्या पद्धतीने पहिल्या माळ्यावरती अतिक्रमण करून बांधकाम वापरत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आरक्षण क्र. ३५ मध्ये सद्यस्थितीत शिवसेवा ट्रस्टच्या ताब्यात किती क्षेत्र आहे त्याचा पंचनामा करावा, येथील प्राथमिक शाळेच्या खल्या जागेवरील अतिक्रमणाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागवावा, शिवसेवा ट्रस्टकडील आजपर्यंत जागाभाडे दंडासह व व्याजासह तात्काळ वसुल करण्यासंदर्भात मुख्याधिकारी यांना आदेशित करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली होती. या इमारतीवरील भाडेवसुली, भाडेनिश्चित व अनामतपोटी रक्कम न भरता त्याच्यावरील येणाऱ्या व्याजापोटी भाड्यामध्ये सूट दिलेली असल्याने त्रिसदसीय समिती व पालिकेतील दोषींच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, शिवसेवा ट्रस्टमध्ये संचालक असलेले सदस्य व न. प. पदाधिकारी असलेले सदस्य किंवा त्यांचे नातेवाईक यांचे उभय संस्थेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हितसंबंध असल्याने व आरक्षण क्र. ३५ मधील शाळेच्या पहिल्या माळ्यावर व खुल्या जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांचेवर प. न. अधिनियमानुसार अपात्रतेची कार्यवाही करावी असेही मुंडे यांनी तक्रारीमध्ये नमूद केले होते,
या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी नेमून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुनावणी चालू केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कापसे यांचे म्हणणे अंशतः ग्राह्य धरून तक्रारदार सवर्णा मंडे या न. प. अधिनियमाच्या कलमानुसार तक्रार करण्यास पात्र नसल्याचे म्हटले. परंतु, न. प. च्या अधिनियमानुसार मुख्याधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर किंवा स्वतःहून पालिका सदस्यास अनाई ठरविण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असल्याचा निष्कर्ष जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केला. तक्रारदार सुवर्णा मुंडे या अर्ज दाखल करण्यास पात्र नाहीत; तथापि या प्रकरणात सकृतदर्शनी तथ्य दिसत असल्याने प्राप्त अधिकारानुसार हे प्रकरण स्वाधिकार कक्षेत चालविण्याचा निर्णय घेत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अंतरीम निकाल देताना म्हटले आहे.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.