*पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा सहाव्या दिवशी सापडला मृतदेह*
दि. 15 - उस्मानाबाद -
*लासोना येथील पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या बबन रसाळ यांच्या कुटुंबियांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने तात्पुरती मदत म्हणून १० हजारांची मदत करण्यात आली आहे. लासोन्याचे उपसरपंच संगमेश्वर स्वामी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील, किशोर बनसोडे, प्रशांत पाटील, नितीन यादव, पोलीस पाटील ज्योतीराम काटे यांच्या उपस्थितीत ही मदत कुटूंबियांकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आली* .
९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्रवाणी-लासोना दरम्यान असलेल्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बुधवारी तेरणा नदीच्या पात्रात तरंगताना आढळून आला आहे. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
बबन भगवान रसाळ (रा. लासोना) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते ९ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले होते. यानंतर लागलीच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल, महसूल, पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी ओढ्यात व तेरणा नदीपात्रात शोधकार्य सुरु केले होते. ड्रोन कॅमेरा, बोट व गळ टाकून ५ दिवस सलगपणे शोध घेतला. परंतु, पथकाच्या हाती काहीच लागले नव्हते. दरम्यान, बुधवारी समुद्रवाणी येथील शेतकरी युवराज ढोबळे यांनी नदीकाठी असलेल्या शेतातील पाणी काढून देण्यासाठी सालगड्याला सांगितले. त्यानुसार समाधान हणमंते हा पाईप टाकून शेतातील पाणी काढून देण्याच्या रहेगाने नदीकाठावर गेला असता तेथे मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. लागलीच ही माहिती त्यांनी लासोन्याच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी ही माहिती समुद्रवाणीचे पोलीस पाटील नामदेव ननवरे यांना देऊन बेंबळी पोलिसांनाही कळविले. पोलिसांनी लासोना येथील तरुणांच्या सहाय्याने तेरणा नदीपात्रात तरंगत असलेला बबन रसाळ यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पाच दिवस पाण्यात असल्याने मृतदेह सडला होता. त्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करुन मयतावर लासोना या त्यांच्या गावी सायंकाली अंत्यसंस्कार केले.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.