उस्मानाबादला कोरोना लस देताना शासनाचा हात आखडताच- बाबुराव चव्हाण

 *उस्मानाबादला कोरोना लस देताना शासनाचा हात आखडताच- बाबुराव चव्हाण*





दि. 15 - उस्मानाबाद -



 *आरोग्य यंत्रणेकडून लसीची मागणी केल्यानंतर ६ जुलै रोजी बीडला १७ हजार डोस, लातूर २० हजार ८००, नांदेड १८ हजार ३०० तर उस्मानाबादला अवधे ९४०० डोस उपलब्ध झाले. १४ जुलै रोजी बीडसाठी ८ हजार, लातूर ८ हजार, नांदेडसाठी १३ हजार तर उस्मानाबादला ४ हजार डोस दिले. ११ जुलै रोजी बीडसाठी १३ हजार ७००, लातूर १५ हजार ८००, नांदेड २१ हजार २०० तर उस्मानाबादला ६ हजार ८०० डोस मिळाले होते.* 

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. असे असतानाच दुसरीकडे जिल्ह्याला लस उपलब्ध करून देताना शासनाकडून हात आखडता घेतला जात आहे. मागील काही दिवसांत शेजारी असलेल्या बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला ५० टक्के लस कमी दिली जात आहे. याचा थेट परिणाम लसीकरणाच्या गतीवर होत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.


जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र होती. ही लाट काही अंशी ओसरल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले. निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. असे असतानाही अनेक लोक बेफिकीरपणे वावरत आहेत. अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. सॅनिटायझर वापराचे प्रमाणही कमी झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी


Hello Osmanabad Page No. 1 Jul 15 2021 Powered by: erelego.com


वावरतानाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळेच की काय, मागील पाच-सात दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडून कोरोना लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दीही होत आहे. असे असतानाच दुसरीकडे सरकारकडून उस्मानाबादला लस पुरवठा करताना हात आखडता घेतला जात आहे. शेजारी असलेल्या लातूर, बीड, नांदेडच्या तुलनेत जिल्ह्याला ५० टक्केच लस पुरवठा केली जात आहे. याचा थेट परिणाम आता लसीकरणाच्या गतीवर होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक लोकांना लस न घेताच केंद्रावरून परतावे लागत आहे. या प्रश्नी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या