बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याची अत्यंत दुरवस्था; शहरवासीयांची वाहतुकीसाठी प्रचंड गैरसोय,,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली पाहणी
*अल्ताफ शेख,प्रतिनिधि उस्मानाबाद,*
बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याची अत्यंत दुरवस्था; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली पाहणी
दि.१४ जुलै रोजी जिल्हाधिकारी सोबत बैठक घेवून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून शहरवासीयांची वाहतुकीसाठी प्रचंड गैरसोय होत आहे. या परिसरात नुकतेच नालीचे काम झालेले असल्याने भुयारी गटार ची आवश्यकता नसून रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची या भागातील नागरिकांनी मागणी केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांना तेथील नागरिकांच्या विनंती प्रमाणे रस्त्याचे काम सुरू करण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लेखी पत्राद्वारे सुचित केले होते.
आज या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त करत बुधवार दिनांक 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावुन स्पष्ट सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, प्र.का.सदस्य सतीश दंडनाईक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, अमित उंबरे, अमोल राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.