पोलिसांच्या मारहाणीत निर्दोष शेख इरफान चा मृत्यू, पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ,एम आय एम प्रभारी अफसर शेख यांची मागणी.

 पोलिसांच्या मारहाणीत निर्दोष शेख इरफान चा मृत्यू,

पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ,एम आय एम प्रभारी अफसर शेख यांची मागणी.





शेख बी जी.


औसा. शेख इरफान शब्बीर वय 32 राहणार रेल्वेस्टेशन दारव्हा जिल्हा यवतमाळ हे आपल्या दोन मित्रांसह दैनंदिन कामाकरिता घरा बाहेर गेलेले असताना दिनांक ६ जुलै दोन २०२१ रोजी दारव्हा पोलिसांनी सदर तिन्ही व्यक्तीविरुद्ध कोणतीही तक्रार व गुन्हा नसताना पकडून पोलीस स्टेशन दारव्हा येथे नेले व अमानुष रित्या बेदम मारहाण केली. पोलीस कर्मचारी दानवे जमादार, सचिन जाधव ,संजय मोहतुरे ,शब्बीर पापूवाले यांनी इरफान यास लाथा बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत इरफान यांचा पोलिस स्टेशन दारव्हा येथे मृत्यू झाला. उपचाराचा देखावा निर्माण करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतकाची या पूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. तसेच सहा जुलै २०२१ रोजी मृतका विरोधात पोलीस स्टेशनला कसल्याही प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार नसताना मृतकास पोलिसांनी लक्ष करून जीवे मारले.मृतक हा अत्यंत गरीब कुटुंबाचा सदस्य आहे तसेच आपल्या परिवारातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने संपूर्ण परिवार आधारहीन झाले आहे म्हणून दोषी पोलिसांवर बडतर्फीची कारवाही करून, सदर पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून वीस लाख रुपये त्वरित देण्यात यावे. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अशा पद्धतीचे निवेदन एम आय एम प्रभारी अफसर शेख व सिद्दिकी मुखीत, नवाब असलम, बाबा पटेल, अजीम नवाज, सैफुल्ला बागवान, अदि कार्यकर्त्यांनी पक्षाच्यावतीने दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या