वैद्यकीय प्रवेशात आर्थिक मागासांना आरक्षण दिल्याबद्दल आ.निलंगेकर यांच्याकडून मोदी सरकारचे अभिनंदन
लातूर/प्रतिनिधी:वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षण ठेवल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला न्याय दिला आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून वैद्यकीय,
दंतवैद्यकीय,पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अन्य मागासवर्ग ( ओबीसी ) कोट्यातील २७ टक्के आणि आर्थिक मागास कोट्यातील १० टक्के विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.या निर्णयाचा पुढचा भाग म्हणून आता मोदी सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठीही आर्थिक दृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी व शैक्षणिक प्रवेश यात कोणतेही आरक्षण नसणाऱ्या वर्गाला मोदी सरकारने न्याय दिला आहे , असे आ.निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एकीकडे राज्यातल्या आघाडी सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले आहे.मोदी सरकारने तातडीने निर्णय घेत वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकत्रित ३७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे.धोरणलकवाग्रस्त ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची उपेक्षा होत असताना केंद्र सरकारचा हा निर्णय दिलासादायक व स्वागतार्ह आहे,असेही आ.निलंगेकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.