बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारी
लातूर,दि.13(जिमाका):- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत बकरी ईद दिनांक 21 जूलै 2021 रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) अत्यंत साधेपणाने साजरी करण्या संदर्भात पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरीकांनी आपल्या घरीच अदा करावी.सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील.नागरीकांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरीकांनी शक्य तो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the chain, Dated 26 जून 2021 आणी त्यांनतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.बकरी ईदच्या निमित्ताने नागरीकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण ,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका ,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनूपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असेही आदेशात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.